35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रपर्यटकांसाठी संधी : विशाल आकाराचे आलिशान क्रुझ मुंबईत दाखल

पर्यटकांसाठी संधी : विशाल आकाराचे आलिशान क्रुझ मुंबईत दाखल

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : समुद्रात मुशाफिरी करणाऱ्या जहाजावर पर्यटनाचा आनंद लुटण्याची मजा काही औरच असते. हाच आनंद देण्यासाठी जागतिक पातळीवर नावाजलेल्या क्रोस्टा क्रुझेस या कंपनीचे ‘कोस्टा व्हिक्टोरिया’ हे आकर्षक जहाज मुंबईत दाखल झाले आहे.

पर्यटकांसाठी संधी : विशाल आकाराचे आलिशान क्रुझ मुंबईत दाखल

खास इटालियन टच असणार्‍या या जहाजाच्या माध्यमातून इच्छूक पर्यटकांना क्रूझ हॉलिडेची मजा लुटता येणार आहे. कोस्टा क्रुझेस ही कंपनी 70 वर्षांहून अधिक काळ समुद्री पर्यटनात कार्यरत आहे. जगभरातील सगळ्या समुद्रांमधून या कंपनीच्या जहाजांनी पर्यटनासाठी प्रवास केला आहे.

पर्यटकांसाठी संधी : विशाल आकाराचे आलिशान क्रुझ मुंबईत दाखल

कोस्टाकडे असणार्‍या जहाजांच्या ताफ्यात ‘कोस्टा व्हिक्टोरिया’ हे एक अतिशय आकर्षक जहाज समजले जाते. ते आज मुंबईमध्ये दाखल झाले. जल वाहतूक मंत्री मनसुख एल. मांडवीय यांच्या हस्ते यंदाच्या हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. भारतात समुद्री पर्यटनासाठी कोस्टाने गेले तीन वर्षे आगमन केले होते. यंदाचे त्यांचे चौथे वर्ष आहे. 29 फेब्रुवारीपर्यंत हे जहाज पर्यटकांच्या सेवेसाठी भारतात असेल.

पर्यटकांसाठी संधी : विशाल आकाराचे आलिशान क्रुझ मुंबईत दाखल

शुभारंभाप्रसंगी जलवाहतूक मंत्री मांडवीय म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून भारतातील पर्यटन क्षेत्रात क्रूझ टुरिझम हा एक अतिशय वेगाने वाढणारा विभाग बनला आहे. अनेक देशांच्या आर्थिक विकासात क्रूझ टुरिझमला अतिशय महत्वाचे स्थान आहे. रोजगार निर्मितीचा एक चांगला स्त्रोत त्याकडे पाहाता येते. क्रूझ टुरिझमच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या रोजगारांची निर्मिती होत असते. कोस्टा क्रूझेस 2016 पासून या क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करीत असल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून कौतुक करतो.

पर्यटकांसाठी संधी : विशाल आकाराचे आलिशान क्रुझ मुंबईत दाखल

कोस्टा व्हिक्टोरिया मुंबई ते कोची, कोची ते मालदिव, मुंबई ते मालदिव आणि मालदिव ते मुंबई या मार्गावर 3 ते 7 रात्रीच्या पॅकेजची सेवा देत आहे. या सहलींमुळे भारतातील क्रूझ बाजारपेठ किती बहरत आहे.

पर्यटकांसाठी संधी : विशाल आकाराचे आलिशान क्रुझ मुंबईत दाखल

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया (आयएएस) यांनी सांगितले की, भारताला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. त्या अनुषंगानेच सरकारकडून या समुद्रकिनार्‍याचा उपयोग पर्यटनवाढीसाठी केला जात आहे. कोस्टा क्रुझेससारख्या कंपनीकडून यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. आता या प्रकारच्या होमपोर्टिंगसाठी अनेक जहाज कंपन्या तयार होतील आणि मुंबई हे भारतातील आघाडीचे पोर्ट म्हणून ओळखले जाईल, असा आम्हाला विश्‍वास वाटतो. आता क्रूझर्स आणि क्रूझ लाईनर्स देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेलींगही सुरु करतील, अशी अपेक्षा भाटीया यांनी व्यक्त केली.

पर्यटकांसाठी संधी : विशाल आकाराचे आलिशान क्रुझ मुंबईत दाखल

सध्या कोस्टा क्रूझ इंडियाकडून 3 ते 4 रात्रींचे पॅकेजेस उपलब्ध करून दिली आहेत. परंतु यावर्षी मुंबई ते मालदिव आणि मालदिव ते मुंबई या मार्गावरील 7 रात्रींच्या पॅकेजलाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय पर्यटक आता दीर्घकालीन क्रूझ प्रवासालाही पसंती देत असल्याचे चित्र या बुकिंगमधून स्पष्ट होत आहे. हे बुकिंग करणार्‍यांमध्ये वैयक्तिक पर्यटक, कॉर्पोरेट ग्रुप्स, मोठी कुटुंबे आणि लग्नसोहळे यांचा समावेश आहे.

पर्यटकांसाठी संधी : विशाल आकाराचे आलिशान क्रुझ मुंबईत दाखल

लोटस एरो एंटरप्रायजेसच्या कार्यकारी संचालक आणि कोस्टा क्रूझ इंडियाच्या प्रतिनिधी नलिनी गुप्ता यांनी सांगितले की, “गेल्या तीन वर्षांत मुंबई ते मालदीव सेलींग हंगामाला मिळालेला प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक होता. सध्या क्रूझ लायनर्स पर्यटकांना त्यांच्याकडील वैविध्यपूर्ण सुविधांच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मला विश्‍वास वाटतो की, सुटी साजरी करण्याच्या या अनोख्या माध्यमाकडे पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतील आणि त्यांना नवीन पर्यटन स्थळे पाहण्यास मिळू शकतील.

पर्यटकांसाठी संधी : विशाल आकाराचे आलिशान क्रुझ मुंबईत दाखल

भारत ते मालदीव सहलीचे स्वरूप

मुंबईपासून मालदीवसाठी 7 रात्रींच्या सहलीची सुरुवात होईल. प्रारंभीच्या दोन दिवसांत महाराष्ट्राची राजधानी मुंबईची मुशाफीर करता येईल. मुंबईमधून क्रूझ दक्षिण भारतातील नवीन मंगळूर आणि पुढे कोचीकडे रवाना होईल. केरळमधील सहलीदरम्यान हाउसबोटचा अदभूत अनुभवही घेता येईल. शहराच्या अंतर्गत भागातील उष्णकटीबंधीय कालवेही पर्यटकांना पाहता येणार आहेत. या कालव्यांमधून जात असताना लगून, मँग्रोव्ह आणि वर्षा वने पाहता येणार आहेत. कोस्टा व्हिक्टोरियामधून एक दिवस प्रवास केल्यानंतर ते मालीमध्ये येईल. तिथे ते दोन दिवस थांबून प्रवाशांना घरी परतण्यापुर्वी मालदीवमधील पांढर्‍याशुभ्र समुद्रकिनार्‍यांवर फिरत समुद्रातील रुपेरी चमकदार पाणी न्याहाळण्याचा अद्वितीय अनुभव मिळवता येईल.

मालदीव ते भारत सहलीची स्वरूप 

ही 7 दिवसांची सहल मालेमधून सुरु होईल. प्रारंभी दोन दिवसांत पर्यटक मालदीवमधील पांढर्‍याशुभ्र समुद्रकिनार्‍यांसह कोरल रीफ पाहू शकणार आहेत. सहलीमधील दुसरे ठिकाण असेल ते म्हणजे श्रीलंका, जे त्यामधील सुंदर प्राणी जगतासाठी पर्यटकांमध्ये प्रसिध्द आहे. कोलंबोमधील पिनावेला हत्ती अभयारण्य हे या सहलीमधील एक प्रमुख आकर्षण राहणार आहे. त्यानंतर क्रूझ शिप भारतामध्ये पोहचेल. गोव्यामधील समृद्ध संस्कृती आणि रंगबिरंगी निसर्ग यांचा आनंद लुटण्यासाठी क्रूझ शिप त्या ठिकाणी पोहचेल. गोव्यामध्ये पोहचल्यावर क्रूझमधील पर्यटक तेथील समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद घेतील. मुंबईत पोहचल्यानंतर कोस्टा व्हिक्टोरिया तिथे दोन दिवस मुक्काम करणार आहे. मुंबईमध्ये शहरातील रोमांचकारी सफरीचा आनंद राहणार आहे. अतिशय सुंदर असणारे कोस्टा व्हिक्टोरिया क्रूझ जहाज त्याचे अंतर्बाह्य सौंदर्य आणि भूमध्यकालीन सौंदर्यासाठी खास ओळखले जाते. आपल्या नवीन रुपड्यांसह पर्यटकांना लुभावण्यासाठी कोस्टा व्हिक्टोरिया सज्ज झाले आहे. ग्रँड बार ते कॅसिनो आणि स्पा ते आलिशान स्युट्स, अशा सर्वच ठिकाणी एक अनोखे सौंदर्य आणि नजाकत पहायला मिळणार आहे. येथे सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छत्राखाली उपलब्ध असतील. कोस्टा व्हिक्टोरियावर पाहुण्यांना अगदी नवीन स्वरुपातील ड्रिंक्स आणि खाद्यपदार्थ यांची मेजवानी चाखता येणार आहे. यामध्ये अ‍ॅपेरोल स्प्लित्ज बार, गोरमेट बर्गर, पिजेरीया पुमीदओरो, तपस आणि पाइला रेस्टॉरंट यांचा समावेश आहे. पर्यटकांकडून केली जाणारी भारतीय पदार्थांची फर्माईश लक्षात घेऊन सर्व भोजनांमध्ये भारतीय खाद्यपदार्थांचाही समावेश केला जाणार आहे. क्रूझ शिपवर 3 स्विमिंग पूल्स, एक वेलनेस एरिया, एक जिम, जॉगिंग ट्रॅक, शॉपिंग एरिया, थिएटर, कॅसिनो, कॉन्फरन्स रुम, सोलेरियम यांचा समावेश आहे. कोस्टा व्हिक्टोरिया आपल्या प्रवाशांचे जादुचे प्रयोग, ऑपेरा, बर्लेस्क डान्सर्स तसेच लोककलांच्या मदतीनेही संपूर्ण मनोरंजन करीत असते. या क्लासिक क्रूझ शिपमध्ये 964 स्टेट रुम्स, सी व्ह्यू, बाल्कनी आणि स्युट्सचा समावेश आहे.

कोस्टा व्हिक्टोरियाची प्रमुख तांत्रिक वैशिष्ट्ये

ध्वज : इटली

टनेज : 75000 जीटी

एकूण लांबी : 252.2 मीटर्स

रुंदी : 32 मीटर्स

प्रवासी केबिन्स : 964

प्रवासी क्षमता : 2394

कर्मचारी संख्या : 790

कोस्टा क्रूझविषयी 

कोस्टा क्रूझ ही एक इटालियन कंपनी आहे, जी जगातील सर्वात मोठा क्रूझ समुह कार्निवल कॉर्पोरेशन आणि पीएलसीचा भाग आहे. 70 वर्षांहून अधिक काळ कोस्टा फ्लीटची जहाजे पाहुणचार आणि अस्सल इटालियन शैलीच्या सुटीची ऑफर देणाऱ्या जगातील समुद्रांमध्ये प्रवास करीत आहेत. उत्तम आहार, वाईन, विविध खरेदीचे अनुभव आणि प्रसिद्ध इटालियन ब्रँडची विस्तृत निवड करण्याच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सध्या कोस्टाच्या ताफ्यात 14 जहाजे आहेत. कंपनीच्या ताफ्यात यंदा आणि 2021 मध्ये दोन नवीन नव्या पिढीतील जहाजांची अपेक्षा आहे. जगातील सर्वात स्वच्छ जीवाश्म इंधन आणि लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) आणि जगातील सर्वात शुद्ध जीवाश्म इंधन यांसारख्या पर्यावरणीय नावीन्यपूर्ण वस्तूंनी ते चालवले जाते. कोस्टा इटालियन उत्कृष्टतेचे प्रतिनिधित्व करते आणि दररोज पाहुण्यांना एक अनोखा आणि अविस्मरणीय सुटीचा अनुभव मिळवून देत असते. कंपनीकडे जगभरात २०,००० हून अधिक कर्मचारी आहेत. जे १४० वेगवेगळ्या मार्गांसह, २५० ठिकाणे आणि ६० पोर्टसवर आपली सेवा प्रदान करीत असतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी