35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeराजकीयNavratri festival 2021 : गृहविभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव 2021 बाबत जारी केल्या मार्गदर्शक...

Navratri festival 2021 : गृहविभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव 2021 बाबत जारी केल्या मार्गदर्शक सूचना

टीम लय भारी

मुंबई : सार्वजनिक नवरात्रौस्तव २०२१ बाबत गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाची लाट ओसरली असली तरी अद्याप कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी नवरात्रौत्सव साजरा करत असताना आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी. असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे (Home Department issued guidelines regarding Public Navratri Festival 2021).

सार्वजनिक नवरात्रौस्तवासाठी मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. तसेच सार्वजनिक मंडळाची देवीची मूर्ती ही ४ फुटाची असावी तर, घरगुती देवीची मूर्ती ही २ फुटांची असावी. देवीची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असावी व तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा : नाना पटोले

तब्बल ७ तासांनी WhatsApp, Facebook, Instagram सेवा सुरु

सार्वजनिक नवरात्रौस्तवासाठी जमा करण्यात येणारी वर्गणी/ देणगी स्वच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रमे / शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

वीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी तसेच देवीच्या मंडपांमध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी.

Navratri festival 2021 : गृहविभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव 2021 बाबत जारी केल्या मार्गदर्शक सूचना

जाणून घ्या बडीशेपचे आरोग्यगायी फायदे, बनवा बडीशेप फ्लेवरचा ग्रीन टी घरच्याघरी

No garba or idol processions this Navratri

तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्रांची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी