31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयफडणवीसांच्या संन्यास घेण्याच्या वक्तव्यावरून मविआच्या नेत्यांची टोलेबाजी

फडणवीसांच्या संन्यास घेण्याच्या वक्तव्यावरून मविआच्या नेत्यांची टोलेबाजी

टीम लयभारी

मुंबई :- ओबीसी आरक्षणासाठी भाजप नेत्यांनी शनिवारी राज्यभर चक्का जाम आंदोलन केले होते. नागपुरातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेते मंडळीनी आंदोलनात आपला सहभाग दर्शवला. या आंदोलनात भाष्य करताना, ‘तीन ते चार महिन्यात ओबीसीचे आरक्षण दिले नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले (OBC reservation is not given I will retire from politics said Devendra Fadnavis).

देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर महविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र फडणवीसांना टोमणे मारण्यास सुरुवात केली. या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत म्हणतात, आम्ही फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, फडणवीसांचे भविष्य हे उज्वल आहे. त्या नंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणतात, या पूर्वी ही फडणवीस म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. पुढे ते म्हणतात फडणवीसांनी असे ही सांगितले होते, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवेल (Fadnavis had said that the issue of reservation of funds would be resolved in the first cabinet meeting).

कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून शरद पवार लवकरच घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

बाळासाहेब थोरातांच्या पुढाकाराने पाणी पुरवठा योजनेसाठी 68 लाख 96 हजार निधी मंजूर

महाविकास आघाडीच्या बैठकीत एकमत नाही, या जागांवर होणार पुन्हा चर्चा

Will not allow Devendra Fadnavis to take sanyas: Shiv Sena

I will retire from politics said Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

तसेच एकनाथ खडसे यांनी ही फडणवीसांना विनंती केली, विरोधी पक्षनेते म्हणून तुमचे काम उत्तम चालू आहे, राजकारण संन्यास तुम्ही घेऊ नका. या वर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी ही यात उडी घेतली , ते म्हणतात ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे खोटे बोलण्याची मशीन आहेत.’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी