31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयमहाविकास आघाडीच्या बैठकीत एकमत नाही, या जागांवर होणार पुन्हा चर्चा

महाविकास आघाडीच्या बैठकीत एकमत नाही, या जागांवर होणार पुन्हा चर्चा

टीम लय भारी

मुंबई :- महाविकास आघाडीची सोमवारी बैठक झाली. ही बैठक येत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या पोटनिवडणूकीसाठी झाली आहे. पोटनिवडणुक एकत्रित लढण्यासाठी महाविकास आघाडी सकारात्मक, मात्र काही निर्णय घेण्यासाठी पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे (There is no consensus in the meeting of Mahavikas Aghadi, these seats will be discussed again).

सोमवारी महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांची एकत्रित बैठक झाली. येत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकाची चर्चा झाली. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही आहे. मात्र महाविकास आघाडी पोटनिवडणूक एकत्र लढण्यासाठी सकारात्मक आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बाळासाहेब थोरातांच्या पुढाकाराने मतदारसंघात उभे राहीले नवे कोविड सेंटर

आरक्षणाचं राजकारण करून सत्तेचा मार्ग शोधत असाल… पवारांनी लगावला टोला

या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते गोपाल दातकर, सेवकराम ताथोड,  प्रहारचे जिल्हाध्यक्ष बबलू जवंजाळ माजी आमदार तुकाराम बिडकर, या नेत्यांनी आघाडीच्या बाबत एकत्रित चर्चा केली. मात्र या बैठकमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 जागांचे वाटप कसे होणार याबाबत निर्णय झाला नाही आहे. त्यामुळे आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे (So another meeting is likely to take place).

या बैठकीनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख म्हणाले, महाविकास आघाडी झाली पाहिजे याबाबत सर्वच सकारात्मक होते. आम्ही बैठकीतील चर्चेचा गोषवारा मंगळवारी वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवणार असून त्यानंतरच महाविकास आघाडीच्या गठणाबाबत बोलता येईल.

There is no consensus in the meeting of Mahavikas Aghadi
महाविकास आघाडी सरकार

शरद पवारांना सर्व फुकट पाहिजे; निलेश राणे

Implement ‘one nation, one ration card’ scheme till July 31, Supreme Court tells Centre

बैठकीत झालेल्या चर्चेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे म्हणाले जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत मतविभाजन टाळून जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे महाविकास आघाडी होण्यासाठी सर्व पक्षांची मते जाणून घेण्यात आली आहेत. आज कोणताही निर्णय झाला नाही.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी या बैठकीबाबत म्हणाले,  आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांसोबत संवाद झाला, चर्चा चांगली झाली. मात्र आघाडी न झाल्यास काँग्रेसच्या बैठकीत आम्ही स्वबळाच्या तयारीचे आवाहन केले आहे. आघाडीबाबत एकमत झाले तर पक्षश्रेष्ठीं सोबत बोलून निर्णय घेण्यात येईल (If there is a consensus on the alliance, the decision will be taken after talking with the party leaders).

जिल्हा परिषदेच्या जागा कोणाला किती मिळणार यावर चर्चा झाली. मात्र त्यावर एकमत झाले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 7 जागांवर तर बाकी 7 जागांवर शिवसेनाकडे असतील. मागच्या निवडणूकीत शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा जास्त मत मिळाली होती. शिवसेनाचा या बैठकीत दावा कायम होता असे 9 मतदारसंघ आहेत. त्यामुळे बाकी 5 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने लढावे का? या सर्व चर्चेमुळे एकमत झाले नाही त्यामुळे पुन्हा बैठकी घेऊन चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी