30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्राईमनाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती.गावठी कट्ट्यासह दोघांना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. तर, नाशिकरोड पोलिसांनी गावठी कट्ट्यासह एकाला जेलरोड परिसरातील म्हाडा कॉलनीतून अटक केली आहे. संशयितांकडून ३६ हजारांचे दोन गावठी कट्टे व काडतुस जप्त केले आहे.  वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलिस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन चौधरी, अंमलदार विनोद लखन, शेख, पंकज कर्पे, सौरभ लोंढे यांच्या पथकाने सापळा रचला.

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती.गावठी कट्ट्यासह (two villagers)दोघांना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. तर, नाशिकरोड पोलिसांनी गावठी कट्ट्यासह एकाला जेलरोड परिसरातील म्हाडा कॉलनीतून अटक केली आहे. संशयितांकडून ३६ हजारांचे दोन गावठी कट्टे(two villagers) व काडतुस जप्त केले आहे.  वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलिस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन चौधरी, अंमलदार विनोद लखन, शेख, पंकज कर्पे, सौरभ लोंढे यांच्या पथकाने सापळा रचला.(Two arrested along with two villagers from Nashik road)

संशयित ऋतिक दत्तू लोहकरे (२५, रा. इच्छामणी गणेश रो हाऊस, जुना सायखेडा रोड, जेलरोड), मयुर राजाराम हिरे (२१, रा. महालक्ष्मीनगर, दसक गाव, जेलरोड) या दोघांना अटक करून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून २६ हजारांची गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आली.याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, नाशिकरोड पोलिसांनी म्हाडा कॉलनीतून संशयित विशाल विजय चाफळकर (२४, रा. पेंढारकर र्कालनी, जेलरोड) यास अटक केली असून, त्याच्याकडून १० हजारांचे स्टीलचे गंजलेला गावठी कट्टा जप्त केला आहे. सदरचा कट्टा त्याने संशयित गणेश उर्फ छकुल्या, रोशन उर्फ बगळ्या यांच्याकडून खरेदी केल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी