31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयनेते पंचतारांकित हॉटेलमध्ये; तर समर्थक रस्त्यावर

नेते पंचतारांकित हॉटेलमध्ये; तर समर्थक रस्त्यावर

टीम लय भारी

मुंबई : राज्यात सध्या ठाकरे गट आणि शिंदे गटांमधील राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. पाच दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आमदारांना घेऊन प्रथमत: सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी गाठले. त्यानंतर हळूहळू एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील तब्बल 40 आमदार तर अपक्ष दहापेक्षा अधिक आमदार आपल्याकडे वळवून घेतले. त्यामुळे आता राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा एक वेगळा गट निर्माण झाला आहे. म्हणूनच राज्यामध्ये शिवसेनेचे समर्थक विरुद्ध एकनाथ शिंदे यांचे समर्थक यांच्यामध्ये देखील राडेबाजी होत असल्याचे दिसून येत आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे समर्थक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. शिवसेनेच्या समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलने सुरू केलेली आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांविरोधात देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये एकीकडे तीव्र आंदोलने, तर दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते समर्थन करताना दिसून येत आहेत.

शिवसेना समर्थकांनी बंडखोरी केलेल्या आमदारांच्या घरांवर आणि कार्यालयांवर हल्ले करत तोडफोड करण्यास सुरुवात केलेली आहे. बंडखोर गटातील आमदार यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे देखील आता प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे त्यांना केंद्राकडून y+ सुरक्षा देण्यात येणार आहे. दरम्यान, बंडंखिर आमदार हे पंचतारांकित हॉटेल मध्ये आराम करत असले तरी, त्यांच्या समर्थनात आणि विरोधात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

हे सुद्धा वाचा :

शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता

डिस्चार्ज मिळताच राज्यपाल कोश्यारी ऍक्शन मोडमध्ये

नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचले; मांजराच्या अवतारातील वाघाचा फोटो टाकून उडविली खिल्ली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी