29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयशिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता

शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता

टीम लय भारी

मुंबई : बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेना पावले उचलत आहे. दुसरीकडे, शिवसेनेकडून दररोज एक तरी आमदार बंडखोरी करत असल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थानातीळ आमदारांचा गट सध्या गुवाहाटीत ठाण मांडून आहे. आता त्यांच्या पक्षातून फुटलेल्या आमदारांच्या यादीत उदय सामंत यांचे नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या गटाने शिवसेनेचे ४० आमदार आणि इतर अपक्षांसह सुमारे ५० पेक्षा अधिक सदस्य जमवले आहेत.

आज सकाळपासूनच शिवसेनेच्या गटातील आणखी एक आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे आमदार उदय सामंतही एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. उदय सामंत आज सकाळी सुरतला गेल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे उदय सामंत हे शनिवारी झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत उपस्थित होते.

उदय सामंत यांनी गुवाहाटीमार्गे सुरतला जाण्यापूर्वी आमदार राजन साळवी यांना फोन केला. तुम्हीपण माझ्यासोबत चला असेही उदय सामंत यांच्याकडून राजन साळवी यांना विचारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण राजन साळवी यांनी उदय सामंत यांना नकार दिल्याचे समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी कोकणात एकनाथ शिंदे, रामदास कदम, भास्कर जाधव, राजन साळवी या अभियंत्यांचा गट तयार झाला. या गटातील नेत्यांच्या कामामध्ये अनिल परब आणि सुनील तटकरे हे कायमच ढवळाढवळ करत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे हे नेते नाराज होते. त्यामुळे कोकणातील अनेक शिवसेनेच्या आमदारांमध्ये त्यांच्याविरोधात प्रचंड नाराजी होती.

उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार आहेत. कोकणातील दीपक केसरकर यांनीदेखील पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. त्याशिवाय, रायगडमधीलही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. पण आता उदय सामंत देखील शिंदे गटात सहभागी झाल्याची माहिती समोर येत असल्याने उदय सामंत यांची बंडखोरी शिवसेनेला मात्र डोकेदुखी ठरू शकते.

हे सुद्धा वाचा :

डिस्चार्ज मिळताच राज्यपाल कोश्यारी ऍक्शन मोडमध्ये

नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचले; मांजराच्या अवतारातील वाघाचा फोटो टाकून उडविली खिल्ली

बंडखोर आमदारांचा खर्च कोण करतेय, अनिल गोटेंनी केली ईडीकडे तक्रार !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी