33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयउदय सामंतांच्या भावाच्या फेसबुक पोस्टमुळं राजकीय वर्तुळात खळबळ

उदय सामंतांच्या भावाच्या फेसबुक पोस्टमुळं राजकीय वर्तुळात खळबळ

शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिलेली आहे. सध्या त्यांच्या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे. कोकणातील बहुचर्चित रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. किरण सामंत (Kiran Samant)आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) या दोघांची नावे चर्चा सुरु असतानाच किरण सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपण माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळं अनेकांना धक्का बसला.( Kiran Samant facebook post viral Withdraws From Ratnagiri Sindhudurg)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकारण रोज नवनवीन वळणं घेत आहे. हे. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर दावा केला होता. पण किरण सामंत यांनी मंगळवारी रात्री उशिरा आपला निर्णय जाहीर केली. त्यामुळं नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर किरण सामंत यांनी सुरुवातीपासून दावा केला होता. येथे त्यांनी मतदारांमध्ये फिरण्यास सुरुवात केली होती. तसेच उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग पट्ट्यात कामाचा धडाकादेखील लावला होता. कोकणावर आमचाच दावा राहील, असे विधान शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी केले होते.

शरद पवारांच्या दिल्ली वारीनंतर आता माढ्यासाठी नव्या नावाची चर्चा

यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपचाच उमेदवार राहीलं. पक्षाने उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढवेन. इतर कोणी लुडबूड करु नये असे जाहीर आव्हान भाजप नेते नारायण राणे यांनी मित्र पक्षांना दिले होते. यानंतर शिंदे गट येथून माघार घेणार का? अशी चर्चा सुरु होती. दरम्यान किरण सामंत यांनी माघारीची पोस्ट केली अन् ती डिलीटसुद्धा केली.

मा. नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता व अब कि ४०० पार होण्याकरिता रत्नागिरी – सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातून किरण सामंत यांची माघार – किरण सामंत. अशा आशयाची पोस्ट करण्यात आली होती. पण काही काळानंतर ती डिलीट करण्यात आली.

Kiran Samant Sindhudurg LokSabha

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गट व भाजपकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले होते. सिंधूरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. पण आता त्यांची ही पोस्ट आणि त्यानंतर पोस्ट डिलीट करण्याचा निर्णय सर्व गोंधळ पाहता किरण सामंतांची भूमिका नेमकी काय असा प्रश्न राजकीय वर्तुळता उपस्थित होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी