33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeआरोग्यउन्हाळ्यात नाश्त्यामध्ये ‘या’ हेल्दी पदार्थांचे करा सेवन

उन्हाळ्यात नाश्त्यामध्ये ‘या’ हेल्दी पदार्थांचे करा सेवन

उन्हाळ्याचे दिवस(summer ) सुरु झाले आहेत. दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या दिवसांत शरीराची आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पण अनेकवेळा वाढत्या गरमीमुळं अनेकजण फक्त शितपेय पिण्यावर भर देतात. नाश्ता जेवण टाळताना दिसतात. अशामुळं थकवा अधिक जाणवतो. त्यावर उपाय म्हणजे हेल्दी नाश्ता. आरोग्याला पोषक असणाऱ्या काही घटकांचा तुम्ही नाश्त्यात समावेश केला तर तुम्ही या दिवसांतही कूल रहाल. त्यासाठी जाणून घेऊयात उन्हाळ्यातही कुल ठेवणारे पदार्थांबद्दल..(breakfast for summer healthy food)

उन्हाळ्याचे दिवस(summer ) सुरु झाले आहेत. दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या दिवसांत शरीराची आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पण अनेकवेळा वाढत्या गरमीमुळं अनेकजण फक्त शितपेय पिण्यावर भर देतात. नाश्ता जेवण टाळताना दिसतात. अशामुळं थकवा अधिक जाणवतो. त्यावर उपाय म्हणजे हेल्दी नाश्ता. आरोग्याला पोषक असणाऱ्या काही घटकांचा तुम्ही नाश्त्यात समावेश केला तर तुम्ही या दिवसांतही कूल रहाल. त्यासाठी जाणून घेऊयात उन्हाळ्यातही कुल ठेवणारे पदार्थांबद्दल..(breakfast for summer healthy food)

ओट्सचे करा सेवन

हा अरोग्यासाठी खूप हेल्दी नाश्ता मानला जातो. कारण ओट्समध्ये अद्वितीय फायबरचे प्रमाण आढळते, ज्याला ग्लूटेन असे म्हणतात. शरीरातील फायबर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी या ग्लूटेनचा वापर होतो. तुम्ही सकाळच्या नाश्ताला दलिया खाल्ल्यास दिवसभर किंवा बराचकाळ तुमचे पोट भरलेले राहिल.

पपईचा ज्यूस किंवा पपई

पपईमुळं शरीरीला एकप्रकारे थंडावा मिळतो. पपई ही शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे त्याचे नियमित सेवन करणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरु शकते. त्यामुळे सकाळी आंघोळ केल्यानंतर नाश्त्याला रिकाम्या पोटी पपई खावू शकता. तसेच पपई पोट साफ करण्यास मदत करते.

रोज सकाळी नाश्त्याला पोहे खाणे ठरेल फायदेशीर

परंतु पपई खाताना काही गोष्टींचीही काळजी घ्यावी लागते. नाश्ताला पपई खाल्ल्यानंतर पुढील सुमारे एक तास दुसरे काहीही खाऊ नका. तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी पपईची मदत होते.

तांदळाच्या पिठाचे पदार्थ

उन्हाळ्यात तुम्ही नाश्त्यात इडली, डोसा किंवा आप्पे असे पदार्थ खाऊ शकता. तसेच नाश्त्यासाठी पोहे, उपमाही, पराठे असेही हलके पदार्थ खाऊ शकता. जे तेलकट नसतील. तुम्हाला संपूर्ण धान्य आवडत असेल तर तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यात त्यापासून तयार केलेल्या दलियाचेही सेवन करू शकता. तांदळाचे पदार्थ पचायला सोपे असतात. त्यामुळे तुम्ही सकाळच्या नाश्तासाठी यापांसून तयार केलेले काही पदार्थ खावू शकता.

आरोग्यासाठी फायदेशीर आहे आंब्याची पाने, जाणून घ्या

 फळं

उन्हाळ्यात हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त आणि ताजे राहते. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्याला टरबूज, खरबूज, काकडी, काकडी, कलिंगड, आंबा, अननस, स्ट्रॉबेरी, लिची, किवी अशी काही हंगामी फळे खाऊ शकता. किंवा यातील काही फळांचा ज्यूसही तयार करुन पिवू शकता. यामुळे दिवसभर शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही.

दही

दह्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे नाश्त्याचे काही पदार्थ तयार करण्यासाठी दह्याचा वापर होतो. नाश्त्यासाठी दही झटपट काम करणारा एक महत्वाचा घटक आहे. कारण यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे तुम्ही सकाळच्या नाश्तात दह्याचा वापर करु शकता. पराठा किंवा वडासोबत तुम्ही दही खावू शकता.

ओटी पोटी कमी करण्यासाठी ‘या’ डाळींचा वापर करा आहारात

पनीर

नाश्त्यासाठी पनीर हा उत्तम पर्याय आहे. नाश्त्यात पनीरचे सेवन केल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. पनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असल्याचे आढळून येते. त्यामुळे तुम्ही नाश्तासाठी पनीरचा वापर करु शकता. तुम्ही पनीरपासून तयार केलेले पराठे खाऊ शकता. तसेच पनीर बुर्जी किंवा, सॅंडविचमध्येही पनीर वापरू शकता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी