33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयनिवडणुक आयोगानं शरद पवार गटाचं केलं कौतुक; नेमकं प्रकरण काय?

निवडणुक आयोगानं शरद पवार गटाचं केलं कौतुक; नेमकं प्रकरण काय?

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाने (Sharad Pawar) शिंदे गट आणि भाजपवर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपानंतर निवडणूक आयोगाने तक्राराची दखल घेत शरद पवार गटाला पत्र पाठवलं आहे. हे पत्र शरद पवार गटाने आपल्या ट्विटर हँडेलवर शेअर करत निवडणून आयोगाचे आभार मानले आहेत. आमच्याकडून सजगतेने करण्यात आलेल्या तक्रारीचे कौतुक केल्याबद्दल आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखल्याबद्दल निवडणूक आयोगाचे मनःपूर्वक आभार! असं शरद पवार गटानं म्हटलं आहे.(Sharad Pawar NCP has received the State Election Commission's letter on complaint filed against Shiv Sena and bjp )

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाने (Sharad Pawar) शिंदे गट आणि भाजपवर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपानंतर निवडणूक आयोगाने तक्राराची दखल घेत शरद पवार गटाला पत्र पाठवलं आहे. हे पत्र शरद पवार गटाने आपल्या ट्विटर हँडेलवर शेअर करत निवडणून आयोगाचे आभार मानले आहेत. आमच्याकडून सजगतेने करण्यात आलेल्या तक्रारीचे कौतुक केल्याबद्दल आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखल्याबद्दल निवडणूक आयोगाचे मनःपूर्वक आभार! असं शरद पवार गटानं म्हटलं आहे.(Sharad Pawar NCP has received the State Election Commission’s letter on complaint filed against Shiv Sena and bjp )

नेमकं काय प्रकरण?

स्टार प्रचारकांच्या यादीत आपल्याच पक्षाच्या नेत्यांची नावे दिली जातात. दुसऱ्या पक्षाची नावे दिली जात नाही. शिंदे गट आणि भाजपने आपल्या यादीत एकमेकांच्या पक्षातील नेत्यांचा समावेश केला आहे. हा आदर्श आचरसंहितेचा भंग असून याप्रकरणी कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.

स्टार प्रचारकांच्या यादीत व्यक्तीच्या नावापुढे त्यांचं पद लिहिलं जात नाही. तो नियमभंग ठरतो. पण शिंदे गटाच्या यादीत नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावापुढे पदं लिहिण्यात आली आहेत. हे चुकीचं आहे. आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

उदय सामंतांच्या भावाच्या फेसबुक पोस्टमुळं राजकीय वर्तुळात खळबळ

भाजपने त्यांच्या यादीत 12 आणि 13व्या नंबरवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं नाव नमूद केलंय. सेक्शन 77 नुसार यादीत कुणाचं नाव घेऊ शकता आणि कुणाचं नाही हे यात नमूद केलं आहे. अशा प्रकारे नाव घेतली असेल तर निवडणुका होईपर्यंत त्यांच्यावर बंदी घालण्याचा आयोगाला अधिकार आहे. तसा कायदा आहे. आपल्या पक्षाच्या यादीत दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची नावे घेऊ शकत नाही. भाजप आणि शिंदे गटाने जी नावे टाकली तो निवडणूक आयोगाचा भंग आहे, असं आव्हाड यांनी सांगितलं होतं.

शरद पवारांच्या दिल्ली वारीनंतर आता माढ्यासाठी नव्या नावाची चर्चा

त्यानंतर आज निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत शरद पवार गटाला एक पत्र पाठवलं आहे. आयोगाचे हे पत्र शरद पवार गटाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडेलवर शेअर केलं आहे. या पत्राद्वारे निवडणुक आयोगाने शरद पवार गटाचे कौतुक केलं आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. तर दुसरीकडं आयाराम गयारामांचे वारी पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी