राजकीय

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन; अजित पवार यांचे खास ते देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू साथीदार!

पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाचे (BJP Pimpri Chinchwad) माजी अध्यक्ष आणि विद्यमान आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप ( Laxman Jagtap passed away) (५९) यांचे मंगळवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. कर्करोगाशी त्यांची झुंज अखेर संपली असून बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात (Jupiter Hospital Baner) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी अश्विनी, मुलगी ऐश्वर्या बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप असा परिवार आहे. मागील ३५ वर्षे राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असून त्यांनी चार वेळा नगरसेवक पद आणि चार वेळा आमदारकी गाजवली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे विश्वासू समजले जाणारे लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यादेखील ते गळ्यातील ताईत बनले. देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन करण्यातही जगताप यांना यश आले असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड या शहरात २०१७ साली भाजपाची एकहाती सत्ता आणण्यात लक्ष्मण जगताप यांनी महत्वाची कामगिरी बजावली होती. राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःचा ठसा उमटविला होता. मात्र मागील काही वर्षे त्याची प्रकृती खालावत गेली. त्यांना उपचारांसाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रबळ इच्छा शक्तीच्या आधारे त्यांनी असाध्य आजाराशीदेखील कडवी झुंज दिली. पण काळाने डाव साधला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

 हे सुद्धा वाचा

‘मराठी तितुका मेळवावा’ मुंबईत मराठीचा डंका; वरळीत रंगणार विश्व मराठी संमेलन

ऑनलाईन गेमिंगमधील सट्टेबाजी, व्यसनाधीन करणारा तसेच लैंगिक कंटेटला बसणार चाप; केंद्र सरकारचे नवे धोरण लवकरच

मुंबई विद्यापीठाच्या विकासाला मुहुर्त सापडेना; एमएमआरडीएची चालढकल

राजकीय क्षेत्रातही लक्ष्मण जगताप यांनी त्यांच्या झुंजार बाण्याने बाहुबलींना मात दिली आहे. २००९ मध्ये त्यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना धूळ चारत विजयश्री खेचून आणली होती. २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या महापालिकेत त्यांनी भाजपचा झेंडा फडकावला. मात्र, त्यांच्या राजकीय वर्तुळातील एक्झिटने भाजपपुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. लक्ष्मण जगताप यांनी अनेक प्रतिष्ठित संस्थामध्ये मनाची पदे भूषविली आहेत. न्यू मिलेनियम स्कुल, प्रतिभा कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, गणेश कॉ ऑप बँक आदी संस्थांचे ते संस्थापक होते. हरिद्वार येथील “पतंजली” संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

आपला माणूस

राष्ट्रवादी काँग्रेस असो अथवा भारतीय जनता पक्ष सर्वांनाच लक्ष्मण जगताप हे “आपला माणूस” वाटत होते, असे त्यांचे मनमिळाऊ व्यक्तिमत्व होते. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याआधी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा किस्सा अद्यापही अनेक राजकारण्याच्या लक्षात आहे. मतदानादरम्यान जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांना ‘मुख्यमंत्री साहेब’ म्हणून हाक मारताच उपस्थित मान्यवरांच्या भुवया उंचावल्या होत्या. आजारपणातही अजितदादांनीही जगताप यांना पक्षभेद विसरून सर्वतोपरी वैद्यकीय मदत देऊ केली होती.

टीम लय भारी

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

14 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

14 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

15 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

15 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

17 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

18 hours ago