25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeमहाराष्ट्र'मराठी तितुका मेळवावा' मुंबईत मराठीचा डंका; वरळीत रंगणार विश्व मराठी संमेलन

‘मराठी तितुका मेळवावा’ मुंबईत मराठीचा डंका; वरळीत रंगणार विश्व मराठी संमेलन

राजकीय वर्तुळात मुंबई आणि मराठी अस्मिता या मुद्द्यावरून जरी कलगीतुरा पाहावयास मिळत असला तरी मुंबईत मराठी भाषेचाच डंका कायम राहणार आहे. (vishwa marathi sammelan) मराठी भाषा, कला, साहित्य आणि संस्कृतीला उजाळा मिळावा यासाठी मुंबईत (Mumbai) मराठी भाषेचा जागर होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) मराठी भाषा विभागामार्फत दि. ४, ५ आणि ६ जानेवारी रोजी ”मराठी तितुका मेळवावा” हे पहिले विश्व मराठी संमेलन (vishwa marathi sammelan) सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी (Sardar Vallabhbhai Patel Stadium, Worli) येथे आयोजित करण्यात आले आहे. मराठी फॅशन शो, जगातील नामांकित मराठी उद्योजकांच्या मुलाखती, लावणी, लोककला अशा विविध कार्यक्रमांनी हे संमेलन रंगणार आहे.

वैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच मराठी अस्मितेच्या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे हे विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ४ जानेवारी रोजी सकाळी १०.०० ते ११.०० दरम्यान उदघाटन सोहळा होणार असून यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री तसेच मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी १२.३० वाजता ” मराठी भाषा काल, आज आणि उद्या” या विषयावर परिसंवाद होणार असून श्रेया बुगडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रणव सखदेव, हर्ष भटकळ, संजीवनी खेर आदी मान्यवर उपस्थित राहतील. यावेळी मराठी वस्त्रालंकाराचा मराठामोळा फॅशन शो, “मराठीचा झेंडा अटकेपार”, “चला हसू या” तसेच लोकसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.

५ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता भक्तिगीते, नाट्यसंगीताची मैफल रंगणार आहे. ११.३० वाजता “मराठी पाऊल पडते पुढे” या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी २.३० वाजता “साहित्य आणि संस्कृती” या विषयावर मनोगत तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी उपस्थितांचा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी “महाताल” हा वाद्यमहोत्सव, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, “महासंस्कृती लोकोत्सव” आदी कार्यक्रमांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

हे सुद्धा वाचा 

ऑनलाईन गेमिंगमधील सट्टेबाजी, व्यसनाधीन करणारा तसेच लैंगिक कंटेटला बसणार चाप; केंद्र सरकारचे नवे धोरण लवकरच

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, महेंद्र कल्याणकरांचे प्रमोशन

मुंबई विद्यापीठाच्या विकासाला मुहुर्त सापडेना; एमएमआरडीएची चालढकल

६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ११.०० वाजता मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत “इन्व्हेस्टर मीट” हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीजा ओक करणार आहेत. सांयकाळी ४.३० वाजता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, संस्कृती बालगुडे “अप्सरा आली” हा लावणीचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. www.marathititukamelvava.com या संकेतस्थळावर निःशुल्क प्रवेश नोंदणी करता येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी