29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमुंबईमुंबई विद्यापीठाच्या विकासाला मुहुर्त सापडेना; एमएमआरडीएची चालढकल

मुंबई विद्यापीठाच्या विकासाला मुहुर्त सापडेना; एमएमआरडीएची चालढकल

मुंबई विद्यापीठाचा सर्वांगीण विकास (Mumbai University development) करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने एमएमआरडीएने (MMRDA) पुढाकार घेतला आहे. पण दु्दैवाने मुंबई विद्यापीठाच्या मास्टर प्लानला मुहूर्त सापडत नसून एमएमआरडीएकडून चालढकल होत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (RTI activist Anil Galgali) यांस एमएमआरडीएने दिलेल्या माहितीतून समोर येत आहे. 40 महिन्यापासून दिल्लीचे सल्लागार काम करत असून त्यांस 5 लाख रुपये देण्यात आले आहेत, मात्र अद्यापदेखील त्यास मुहुर्त सापडलेला नाही. एमएमआरडीएकडे चालढकल होत असल्याची खंत व्यक्त करत अनिल गलगली म्हणाले की अजूनही एमएमआरडीएला खात्री नाही आहे की मास्टर प्लान केव्हापर्यंत पूर्ण होईल. सल्लागारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी अनिल गलगली यांची आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीएकडे मुंबई विद्यापीठाच्या मास्टर प्लानची माहिती मागितली होती. एमएमआरडीएचे जन माहिती अधिकारी अंकित दास यांनी अनिल गलगली यांस कळविले की सदर मास्टर प्लान बनविण्याची प्रक्रिया प्रगती पथावर आहे. सदर मास्टर प्लान बनविण्यासाठी नेमलेल्या सल्लागारास आतापर्यंत 4 लाख 96 लाख रुपये इतकी रक्कम त्याने सादर केलेल्या देयकानुसार अदा करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत कारने तरुणीला चार किमी फरफटत नेले; मृत तरुणीची आई म्हणाली हा कसला अपघात?

क्लास वन अधिकारी कल्याणकारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात; आजपासून सामूहिक रजेवर, सिल्लोडमधील अब्दुल सत्तार यांच्या कृषि महोत्सवावर बहिष्कार

अजित पवार यांच्या छ. संभाजी महाराजांबद्द्लच्या विधानावरुन भाजप-शिंदे गट आक्रमक

मुंबई विद्यापीठाचा मास्टर प्लान तयार करण्यासाठी एमएमआरडीएने 28 ऑगस्ट 2019 रोजी दिल्ली येथील मेसर्स डीडीएफ कन्सलेंट यास काम दिले असून एकूण रु 1.12 कोटीचे कंत्राट आहे. मागील 40 महिन्यापासून मास्टर प्लान तयार होत आहे. मात्र अद्यापदेखील त्या कामाला मुहुर्त न मिळाल्यामुळे सल्लागारांवरच आता दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी