32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयलखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर महाविकास आघाडी संतप्त, राज्यव्यापी बंदचा दिला इशारा

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर महाविकास आघाडी संतप्त, राज्यव्यापी बंदचा दिला इशारा

टीम लय भारी

मुंबई : लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारावर महाविकास आघाडी सरकारने संताप व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने राज्यव्यापी बंदचा इशारा दिला आहे. दि. ११ ऑक्टोबर पासून राज्य बंद आंदोलन करणार आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे (Mahavikas Aghadi angry over Lakhimpur Kher violence case).

या आधी ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘राज्यात जेल भरो’ आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधीं यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवल्याप्रकरणी त्यांनी हा इशारा दिला आहे.

जनतेला मदत करा, याच माझ्यासाठी शुभेच्छा  : राज ठाकरे      

मंत्रालयासमोर एका व्यक्तीने स्वतःला जाळून घेण्याचा केला प्रयत्न

 

लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात ९ व्यक्ती मृत पावल्या आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृत पावलेल्या व्यक्तीत ४ व्यक्ती या शेतकरी आहेत. या प्रकरणावरून देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

काँग्रेसला या संकटातून बाहेर पडण्यासाठी संजय राऊतांनी दिला सल्ला

Lakhimpur Kheri violence: Maha Vikas Aghadi calls for statewide bandh on October 11, says Maharashtra Minister Jayant Patil

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी