31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयमहाविकास आघाडी राजकारणासाठी जीवही घेऊ शकते; मीनाक्षी शिंदेचा खळबळजनक आरोप

महाविकास आघाडी राजकारणासाठी जीवही घेऊ शकते; मीनाक्षी शिंदेचा खळबळजनक आरोप

उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर मुंबईत आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांच्या जीवाला आता महाविकास आघडीच्या नेत्यांकडूनच धोका असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे त्यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे. रोशनी हिचा केवळ वापर करुन घेतला जातोय राजकारणासाठी तिचा हे लोक जीवही घेऊ शकतात असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

मिनाक्षी शिंदे यांनी पत्रात म्हटलं आहे की, “दोन दिवसांपासून ठाण्यात रोशनी शिंदे पवार या महिलेवरून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांकडून होत आहे.”

“रोशनी शिंदे पवार, या महिलेला ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमधून वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्यानंतरही या लोकांनी संपदा हॉस्पिटलमध्ये जबरदस्ती भरती केले. तेथील डॉ. उमेश आलेगांवकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सदरच्या महिलेची सोनोग्राफी केली असता, त्या गर्भवती नाहीत व इतर रिपोर्टनुसार त्यांना कुठल्याही प्रकारच्या अंतर्गत जखमा, फॅक्चर, मारहाण झालेली नाही, असं सांगितलं. सिव्हिल रुग्णालयानेही बाह्य स्वरूपाची जखम नाही, असं प्रमाणपत्र दिले आहे”, असं मिनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

महाविकास आघाडी राजकारणासाठी जीवही घेऊ शकते; मीनाक्षी शिंदेचा खळबळजनक आरोप

 

रोशनी हिचा केवळ वापर करुन घेतला जात आहे. तिला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. या प्रकारावरुन हेच सिद्ध होत आहे की, रोशनीच्या माध्यमातून ठाकरे आणि राष्ट्रवादीचा गट सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनच रोशनी हिच्या जीवाला धोका असल्याचा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. त्यातही या महिलेची प्रकृती चांगली असून केवळ तिच्या आधारे सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे तिला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

meenakshi shinde letter to thane police commissioner in roshani shinde case

दुसरीकडे मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, राजकारण बाजूला राहू द्या. विचार करा, स्त्रीचे पूर्णत्व हे मातृत्व असते. तिला लाथा बुक्यांनी मारहाण झाली हे महाराष्ट्राला माहिती आहे. ताई रोशनी तुमची बहिण आहे. कमीत कमी तिची तक्रार तर नोंदवून घ्यायला सांगा, असा सल्ला त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा : 

रोशनी शिंदे मारहाणप्रकरण दिल्ली दरबारात; ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी, शिंदे गटाच्या भावना गवळी यांनी घेतली अमित शहांची भेट

आदित्य ठाकरे हळहळले !

सावरकर गौरव यात्रेत मग्न शिंदे-फडणवीस सरकार छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले

Meenakshi Shinde’s sensational allegation to Uddhav Thackeray, Rajan vichare, Jitendra Awhad, Meenakshi Shinde, Uddhav Thackeray, Rajan vichare, Jitendra Awhad

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी