29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयबागेश्वर महाराजावर कारवाई करा; राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

बागेश्वर महाराजावर कारवाई करा; राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्रकृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांनी साईबाबांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.

साईबाबा यांच्यावर करोडो भाविकांची श्रद्धा आहे. या श्रद्धेला गालबोट लावण्याच्या उद्देशाने काही लोक वाचाळपणा करीत आहेत. मात्र, तो खपवून घेतला जाणार नाही, अशा वाचाळवीरांवर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. बागेश्वरमहाराज यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागितली असली तरीही त्यांनी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी याबद्दल प्रायश्चित घेण्याची आवश्यकता आहे. राज्यसरकारने बागेश्वर महाराज यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, शिर्डी साई संस्थानमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्यसरकार सकारात्मक आहे. याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन मार्ग काढला जाईल.

हे सुध्दा वाचा

मग्रूर सीबीएसई, आयसीएसई शाळांकडून राज्यसरकारच्या जीआरला केराची टोपली

विदर्भात राष्ट्रवादी पाडणार काँग्रेसला खिंडार; मोठ्या नेत्याच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा

रोशनी शिंदे मारहाणप्रकरण दिल्ली दरबारात; ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी, शिंदे गटाच्या भावना गवळी यांनी घेतली अमित शहांची भेट

साई संस्थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी संस्थानच्या सेवेत सामावून घ्यावे म्हणून मी प्रयत्न केले होते. हा प्रश्न न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने काही भूमिका घेतली आहे. राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीवर चर्चा होऊन हा प्रश्न सुटेल, असा विश्वासही विखे पाटील यांनी व्यक्त केला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी