33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच योगी विरुद्ध मोदी भाजपाने केलेली खेळी ; नवाब...

कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच योगी विरुद्ध मोदी भाजपाने केलेली खेळी ; नवाब मलिक यांची टीका

टीम लय भारी

मुंबई :-  मागील काही दिवसापासून मोदी (Modi) आणि योगी (Yogi) यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तर प्रदेशमधून समोर येत आहेत. कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच योगी विरुद्ध मोदी भाजपाने केलेली खेळी आहे अशी नवाब मलिक यांनी टीका केली आहे (Nawab Malik criticizes Modi for playing BJP against Yogi to cover up failures in Corona era).

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मीडियाशी संबोधित करताना ही टीका केली. काही दिवसापासून मोदी (Modi) आणि योगी (Yogi) यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तरप्रदेशमध्ये येत आहेत. मात्र, कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती आहे, असे नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले. कोरोना काळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र अख्खा देशाने आणि जगाने पाहिले. यामुळे योगी (Yogi) यांच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. हे अपयश झाकण्यासाठी मोदी (Modi) विरुद्ध योगी (Yogi) असे चित्र उभे करण्याचा भाजपचा प्लॅन तयार असल्याचा दावाही त्यांनी केला.

कोरोनाच्या संकटात जेकेएसपी समर्पण फाऊंडेशनकडून ऑक्सिजनची मदत

लसीकरणाचा डेटा सार्वजनिक करू नका या केंद्राच्या आदेशावर नवाब मलिकांचा सवाल

BJP may have spoken to Tendulkar: Sachin Pilot rubbishes rumours of joining saffron party

भाजपचा पराभव निश्चित

४ वर्षांत योगींनी आपल्या कार्यकाळात फक्त राज्यात द्वेषाचे वातावरण निर्माण केले. सर्वसामान्य जनतेला फायदा होईल अशी एकही योजना राबवण्यात आली नाही. कोरोनात फक्त सरकारच्या तिजोरीतील निधी मोठमोठ्या जाहिरातींवर खर्च करण्यात आला, असा आरोप करतानाच उत्तरप्रदेशमध्ये आपला पराभव होणार हे भाजप आता समजून चुकली आहे. त्यामुळेच भाजप चिंताग्रस्त झाली आहे. परंतु उत्तरप्रदेशमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागणार हे निश्चित आहे, असेही नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले.

लसीकरणाचा डाटा का लपवायचा?

यावेळी त्यांनी लसीकरणावरही भाष्य केले. केंद्रसरकार कोरोना लसीकरणाबाबतचा माहितीचा डाटा सार्वजनिक करु नका, असे राज्यांना सांगत आहे. मात्र किती लस आम्हाला दिली आणि किती लसीकरण केले हे लोकांना सांगणे गरजेचे आहे. हे लोकांपासून का लपवायचे? असा सवाल त्यांनी केला.

माहिती लपवून कोरोनाला हरवू शकत नाही

किती लस आली? किती लोकांना लसीकरण करण्यात आले याची माहिती स्वतः केंद्रसरकारने दर आठवड्याला जाहीर करावी. कुठल्या राज्याला किती लस दिली हे सांगावे. किती लसीकरण केले याची पारदर्शकपणे माहिती द्यावी. माहिती लपवून कोरोनाला हरवू शकत नाही, असा चिमटाही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काढला.

अद्याप लसींचा साठा नाही

केंद्रसरकारने १२ कोटी लस पुरवठा जूनपर्यंत देण्याची घोषणा केली होती. १० दिवस उलटून ११ दिवस उजाडला तरी केंद्रसरकारने केलेल्या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. केंद्रसरकार फक्त घोषणा करते त्यावर अंमलबजावणी होत नाही. लस उपलब्ध करण्यात केंद्रसरकार अपयशी ठरले आहे. हे लपवण्यासाठी लसीकरणाचा डाटा सार्वजनिक करू नका. यामुळे मार्केटिंग कंपन्यांना फायदा होईल असे सांगत आहे. परंतु हे तथ्यहिन असल्याचा दावा नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी