33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रनिवृत्त IAS अधिकाऱ्याच्या मनाचा मोठेपणा, 'कोरोना' संकटात सापडलेल्या गावाला दिला मदतीचा हात

निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या मनाचा मोठेपणा, ‘कोरोना’ संकटात सापडलेल्या गावाला दिला मदतीचा हात

टीम लय भारी

मुंबई :-  ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच आरोग्यच्या सुविधाचा तुटवडा निर्माण होतो आहे. अशा परिस्थितीत कोरोनाबाधितांना ऑक्सिजनची (Oxygen) अत्यंत आवश्यकता असताना संकटाच्या काळात ‘जेकेएसपी समर्पण फाऊंडेशन’ (JKSP Dedication Foundation) कडून अतिशय महत्त्वाची मदत मिळाली आहे असे प्रतिपादन गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी केले.  

मलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास माजी विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या प्रयत्नातून ‘जेकेएसपी समर्पण फाऊंडेशन’ (JKSP Dedication Foundation) कडून चेअरमन सत्यपाल जैन यांनी तीन ऑक्सिजन (Oxygen) कॉन्संट्रेटरची मदत देण्यात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहायक गटविकास अधिकारी भरत चौगले, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, जिल्हा परिषद सदस्य बाबासो पवार, सरपंच दादासाहेब जगदाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज कुंभार, डॉ. निखिल नायर, तानाजी मगर, विस्तार अधिकारी प्रशांत सातपुते, जगन्नाथ सत्रे, विनोद मगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

लसीकरणाचा डेटा सार्वजनिक करू नका या केंद्राच्या आदेशावर नवाब मलिकांचा सवाल

माजी IAS चंद्रकांत दळवी यांची पुणे महापालिकेच्या हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती

In rural India, people are hiding their Covid-19 infection because of mistrust in the health system

सर्जेराव पाटील म्हणाले, तानाजी सत्रे यांनी मलवडी आणि पंचक्रोशीतील चांगल्या कामात नेहमीच मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांनी ‘जेकेएसपी’च्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यावधींची मदत दिली आहे. आता महामारीच्या काळात ऑक्सिजन (Oxygen) कॉन्संट्रेटरची मदत या भागातील रुग्णांसाठी दिलासादायक आहे. राजकुमार भुजबळ म्हणाले, या आरोग्य केंद्रास मदत करण्यासाठी अनेक दानशूर हात पुढे आले आहेत. या मदतीतून नक्कीच या केंद्रात रुग्णांना चांगली सेवा दिली जाईल.

बाबासो पवार म्हणाले, ‘मदत पीएचसी’ या अभियानाला लोकांकडून खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मदतीतून या आरोग्य केंद्राचा कायापालट होईल. डॉ. मनोज कुंभार म्हणाले, अत्यंत आवश्यक असलेले ऑक्सिजन (Oxygen) कॉन्संट्रेटर मिळाल्यामुळे पुढील उपचाराची सोय होईपर्यंत रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी