34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयअर्णव गोस्वामीला उच्च न्यायालयाने जामीन नाकारला, अर्णवची दिवाळी आता तुरूंगातच

अर्णव गोस्वामीला उच्च न्यायालयाने जामीन नाकारला, अर्णवची दिवाळी आता तुरूंगातच

टीम लय भारी

मुंबई : अर्णव गोस्वामी याला जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जामीन मिळविण्यासाठी अर्णवने प्रचलित मार्गाचा अवलंब करावा अशी सुचना न्यायालयाने केली आहे ( Mumbai high court denied bail to Arnab Goswami ).

न्यायालयाच्या या सुचनेनुसार अर्णवला आता रायगड जिल्ह्यातील महानगर दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल. तिथे जामीन मिळाला नाही तर स्थानिक सत्र न्यायालयात अर्ज दाखल करता येईल ( Arnab Goswami can apply at local court for bail ).

शनिवारच्या सुनावणीमध्ये सुद्धा न्यायालयाने जामीनासाठी प्रचलित पद्धतीचा अवलंब करावा असे म्हटले होते. परंतु अर्णव यांच्या सुटकेबाबत न्यायालयाने लवकर निर्णय द्यावा, अशी विनंती अर्णव गोस्वामी यांचे वकील हरीश साळवे यांनी केली होती. त्याबाबत न्यायालयाने आज निकाल देताना अर्णव याची विनंती फेटाळून लावली आहे.

हे सुद्धा वाचा

अर्णव गोस्वामीसाठी देवेंद्र फडणविसांची न्यायालयाला विनंती, राज्यपालांचाही दुसऱ्यांदा दूरध्वनी

Eknath Khadse : मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिले : एकनाथ खडसे

हे प्रकरण फारच तातडीचे वाटत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने यात निकाल द्यायची गरज वाटत नाही. याचिकाकर्ते उपलब्ध असलेल्या प्रचलित मार्गांचा अवलंब करू शकतात, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

न्यायालयाने अर्णवची विनंती फेटाळल्याने आता त्याला स्थानिक न्यायालयात अर्ज दाखल करावा लागेल. मंगळवारी त्याने अर्ज दाखल केल्यानंतर या अर्जावर चार दिवसांत न्यायालयाला आपला निर्णय द्यावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी