34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयअर्णव गोस्वामीसाठी देवेंद्र फडणविसांची न्यायालयाला विनंती, राज्यपालांचाही दुसऱ्यांदा दूरध्वनी

अर्णव गोस्वामीसाठी देवेंद्र फडणविसांची न्यायालयाला विनंती, राज्यपालांचाही दुसऱ्यांदा दूरध्वनी

टीम लय भारी

मुंबई : अर्णव गोस्वामी यांना वाचविण्यासाठी अख्खा भाजप पक्ष आकाश पाताळ एक करीत आहे. अशातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अर्णवच्या मदतीसाठी धावून आले आहेत ( Bhagat Singh Koshyari helping to Arnab Goswami ).

कोश्यारी यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला. अर्णव गोस्वामीची सुरक्षा व त्याच्या आरोग्याबाबत राज्यपालांनी चिंता व्यक्त केली ( Bhagat Singh Koshyari called to Anil Deshmukh ). अर्णवच्या कुटुंबियांनाही अर्णवला भेटू देण्याची सुचना कोश्यारी यांनी यावेळी केली.

यापूर्वी सुद्धा राज्यपालांनी अर्णव गोस्वामीसाठी अनिल देशमुख यांना फोन केला होता. गोस्वामी यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याची नाराजी त्यावेळी राज्यपालांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आज पुन्हा दुसऱ्यांदा राज्यपालांनी देशमुख यांना फोन केला आहे ( Bhagat Singh Koshyari called to Anil Deshmukh twice ).

हे सुद्धा वाचा

फडणवीस सरकारनं अर्णब गोस्वामींची चौकशी होऊ दिली नाही

मराठी महिलेवर अन्याय झाला तरी चालेल, पण अर्णव गोस्वामींना अटक करू नका : शिवसेनेचा भाजपला टोला

Arnab Goswami : अर्णव गोस्वामींमुळे मराठी उद्योजक व त्यांच्या आईने केली होती आत्महत्या

उद्धव ठाकरेंनी ठणकावले, हा देश भाजपची मक्तेदारी नाही

देवेंद्र फडणवीसांची उच्च न्यायालयाला विनंती

अर्णव गोस्वामीला लवकर जामीन मंजूर व्हावा यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट केले आहे. या ट्विटद्वारे त्यांनी उच्च न्यायालयाला विनंती केली आहे ( Devendra Fadnavis requested to High Court for Arnab Goswami ).

अर्णव गोस्वामी यांच्या आरोपानुसार त्यांना अटक करण्यापासून ते कोठडीत हाताळण्यापर्यंत ‘महाविकास आघाडी’ सरकार ज्या पद्धतीने वागणूक देत आहे, त्याची न्यायालयाने स्वतःहून दखल घ्यावी, अशी विनंती फडणवीस यांनी या ट्विटद्वारे केली आहे.

छगन भुजबळांनी राज्यपालांना हाणला टोला

अर्णव गोस्वामीच्या मदतीसाठी राज्यपालांनी गृहमंत्र्यांना फोन केल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी टोला हाणला आहे. राज्यपाल छोट्या छोट्या गोष्टींत लक्ष घालत आहेत, ही चांगली बाब आहे, अशा शब्दांत भुजबळ यांनी चिमटा काढला आहे ( Chagan Bhujbal Scathing to Bhagat Singh Koshyari ).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी