33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयनाना पटोलेंची मोदी सरकारवर टीका, ओबीसींचे आरक्षण रद्द होण्याला मोदी सरकार जबाबदार

नाना पटोलेंची मोदी सरकारवर टीका, ओबीसींचे आरक्षण रद्द होण्याला मोदी सरकार जबाबदार

टीम लय भारी

मुंबई :- ओबीसी समाजाच्या आरक्षणावर राज्यातील राजकारण आता ओढातानीचे झाले आहे. आरोप प्रत्यारोप फेऱ्या चालू आहेत. ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होण्याला मोदी सरकार जबाबदार आहे. अशी घणाघात टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे (Nana Patole scathing criticism on Modi government).

ओबीसी समाजाच्या आरक्षणावर राजकीय वातावरण खूपच तापलेले आहे. यातच नाना पटोले यांनी मोदी सरकार विरोधात टीका करत. तीन ट्विट केले आहेत. यात ते म्हणाले, ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे.

‘धनगरांनी भाजपच्या आंदोलनात सहभागी होऊ नये’

जितेंद्र आव्हाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा जन्म घ्यायला हवा

ओबीसींचे हे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे. मोदी सरकार विरोधात २६ जून रोजी काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. असे नाना पटोले यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. मोदी सरकारवर घणाघात टीका केली आहे. (Nana Patole said that Modi government is responsible for cancellation of reservation of OBC community).

यानंतर नाना पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. असे ते त्यांच्या दुसऱ्या ट्विट मध्ये म्हणाले.

ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांनी केंद्र सरकारला फटकारलं

Jharkhand Congress to demand 27% OB .. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/83819642.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

नाना पटोले म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हे त्यांचे तिसरे ट्विट आहे.

काही दिवसांपासून नाना पटोले यांनी मोदी सरकाला धारेवर धरले आहे. या देशातून मोदी सरकार जाईल तेव्हाच या देशात अच्छे दिन येतील. ही मोदी सरकार तर इंग्रज राजवट पेक्षा अधिक जुलमी आहे. या सरकारला सामान्य जनतेशी काही घेणदेणं नाही आहे. हे सरकार फक्त स्वतःच विचार करते. मोदी सरकार ही जुलमी सरकार आहे. काल माध्यमांशी बोलतांना नाना पटोले यांनी मोदी सरकारवर घणाघात टीका करत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी