33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयफरार किरण गोसावी, सचिन पाटील नावाने करायचा फसवणूक : पुणे पोलीस

फरार किरण गोसावी, सचिन पाटील नावाने करायचा फसवणूक : पुणे पोलीस

टीम लय भारी

पुणे: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणीतील साक्षीदार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. अखेर आज पुणे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत(Nawab Malik Made Claim Against Wankhede & Gosavi )

राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि किरण गोसावीविरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत.

मात्र किरण गोसावीविरोधात यापूर्वीपासून अनेक गुन्हे दाखल होतेअशातच चिन्मय देशमुख तरुणाने नोकरीच्या आमिष दाखवून किरण गोसावीने आपली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

राज्यातील ‘हे’ मंत्री पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह

एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावीला अखेर बेड्या!

 याप्रकरणी अखेर किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याचपार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत आरोपी किरण गोसावी संदर्भात माहिती दिली आहे.

मार्च २०१९ मध्ये गोसावीविरोधात आरोप पत्र दाखल

२०१८ च्या एका गुन्ह्यात किरण गोसावीविरोधात गुन्हा दाखल केला होता. या आरोपीविरोधात ४२० आयटी अॅटनुसार फसवणूकीचे गुन्हे दाखल होते. यात एका व्यक्तीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून मलेशियाला पाठवत त्याची किरण गोसावीने फसवणूक केली होती. मार्च २०१९ मध्ये गोसावीविरोधात आरोप पत्र दाखल करण्यात आले. मात्र तेव्हापासून तो फरार होता.

दिवाळीत पार्लरला जाणे टाळा अन् घरबसल्या चेहऱ्यावर आणा पार्लरचा ग्लो

Nawab Malik making statements keeping one community in mind: BJP MP Gopal Shetty

अलीकडच्या काळात त्याचे फोटोग्राफ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. तेव्हापासून पुणे पोलिसांचे अनेक पथकं त्याचा मागावर होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास किरण गोसावीला अटक करण्यात यश आले आहे. त्य़ाची अटक प्रक्रिय़ा पूर्ण करतोय. गोसावीच्या अटकेनंतर आता चारशीटचा राहालेला भाग पूर्ण करणार आहोत. यापुढेही त्याविरोधात काय गुन्हे आलेच तर त्यावर आपण तक्रार दाखल करणार आहोत. असं पुणे पोलीस आयुक्त म्हणाले.

एका लॉजमधून किरण गोसावीला अटक

कात्रज येथील एका लॉजमधून किरण गोसावीला अटक करण्यात आली आहे. त्याने आत्मसमर्पण केलेले नाही त्याला पुणे पोलिसांनी सकाळी तीन वाजता अटक केली आहे, आता कोर्टाच्या आदेशानंतर पुढील तपास केला जाईल अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

गेल्या १० दिवसांपासून पुणे पोलीस त्यांच्या मागावर

गेल्या १० दिवसांपासून पुणे पोलीस त्यांच्या मागावर होते. गेल्या दहा दिवसात किरण गोसावीचे लखनऊ, जबलपूर, तेलंगणा, हैदराबाद, फतेहपूर, जळगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा भागात लोकेशन दिसले. यात केपी गोसावी सचिन पाटील या नावाने लपत होता. हॉटेलमध्ये राहत होता. लखनऊमध्ये किरण गोसावी सचिन पाटील नावाने हॉटेलमध्ये राहत होता. तसेच तो स्टॉप क्राईम ऑर्गनायजेशन एनजीओचा सदस्य तसेच शिप्का नावाच्या डेटेक्टिव्ह एन्जसीचा मेंबर असल्याचे सांगायचा. याशिवाय एक्सपोर्ट- इनपोर्टमध्ये त्याचा व्यवसाय आहे. यात मेटल, इलेक्ट्रोनिक्सच्या एक्सपोर्ट – इमपोर्टचं काम करतो असं सागांयचा. नोकरीचे आमिष दाखवून फसवल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अशी माहितीही पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता दिली आहे.

चिन्मय देशमुखने पोलिसांना मदत केली

चिन्मय देशमुखला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. चिन्मय देशमुखने पोलिसांना मदत केली, चिन्मयने आम्हाला जी माहिती दिली ती चार्जशीटमध्ये दाखल करणार आहोत. चार्जशीटमध्ये ज्या ज्या गोष्टी राहून गेल्या आहेत, त्या सर्व नमूद केल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं.

एनसीबीशी संपर्क नाही

आम्ही तूर्तास आम्ही या केसवर लक्ष केंद्रीत करत असून आर्यन खान प्रकरणावर फोकस नाही. नंतर या गोष्टी येतील,  एनसीबीने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही, तसेच गोसावीला आपल्याकडे सुपूर्द करण्यासाठी मुंबई पोलिसांसह कोणत्याही एजन्सीने आमच्याशी संपर्क साधला नाही, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी