31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयएनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही, नवाब मालिकांची टीका

एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही, नवाब मालिकांची टीका

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर आरोप केले आहेत. गांजा समजून एनसीबीने तंबाखू ताब्यात घेऊन माझ्या जावयाला अटक केली. माझ्या जावयाकडे हर्बल तंबाखू सापडला असल्याचे कोर्टाच्या ऑर्डरमध्ये दिसून आलं आहे. असे म्हणत मलिक यांनी एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळतो का? अशी टीका केली आहे (Nawab Malik’s serious allegations against NCB).

बेलार्ड इस्टेट येथील राष्ट्रवादी भवन येथे मलिक यांची पत्रकार परिषद पार पडली. या वेळी त्यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबी सिलेक्टिव्ह खबर लीक करून लोकांना बदनाम करण्याचं काम करत आहे. एनसीबीच्या छाप्यात २०० किलो गांजा मिळाला नसून साडेसात ग्रॅमचा गांजा फर्निचरवाल्याकडे मिळाला. बाकी सर्व हर्बल टोबॅको आहेत हे रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे, असे मलिक म्हणाले.

Nawab Malik : PM मोदीनी स्वतः लस घेऊन लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी

नवाब मलिकांनी अखेर जाहीर केलं ‘त्या’ भाजपा पदाधिकाऱ्याचं नाव!

“माझा जावई समीर खानला २०० किलो ड्रग्ज सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो ड्रग्जचं रॅकेट चालवतो असं सांगण्यात आलं होतं. एनसीबीच्या कारवाईचे फोटो आणि प्रेस रिलीज समीर वानखेडे यांच्या नंबरवरूनच पाठवण्यात आले होते. मात्र, न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचं उघड झालं आहे”, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी सांगितला घटनाक्रम

“८ जानेवारी २०२१ रोजी एनसीबीनं पत्रकारांना सांगितलं की दोन पार्सल युनिव्हर्सल कार्गोमधून जप्त करण्यात आले. जे करण सजनानीनं विजय शर्मा नावाच्या एका व्यक्तीकडे शिलाँगला पाठवायला बुक केलं होतं. ९ जानेवारीला वांद्र्यात करण सजनानीच्या घरी छापा टाकला आणि एनसीबीनं प्रेस रिलीज काढून २०० किलो गांजा जप्त केल्याची माहिती दिली. त्याच दिवशी एनसीबीच्या एका अधिकाऱ्याच्या नंबरवरून प्रेस रिलीज आणि ४ फोटो पाठवले गेले. याच नंबरवरून सगळ्यांना मेसेजेस पाठवले गेले. ९ जानेवारीला शाहिस्ता फर्निचरवाला नावाच्या मुलीकडे ७.५ ग्रॅम गांजा सापडला. तिला त्याच दिवशी जामीन दिला गेला. नवी दिल्लीत प्रिन्स पान, हाऊस ऑफ पान, रॉइस पान नोएडा, सांजा पान गुडगाव, नितीन बँगलोर, मुच्छड पानवाला याच्याकडे छापा टाकला गेला”, असं मलिक यांनी सांगितलं.

“१२ तारखेला रात्री समीर खान यांना एनसीबीचं समन्स मिळालं आणि १३ तारखेला १० वाजता बोलावण्यात आलं. समीर खान एनसीबी कार्यालयात पोहोचले. संध्याकाळपर्यंत माहिती आली की २७ अ कलमांतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. जेल कस्टडीनंतर आमची जामीन याचिका रद्द झाली. ६ महिने पूर्ण झाले तेव्हा सुनावणी झाली आणि एनसीबीनं तेव्हा चार्जशीट फाईल करतो असं सांगितलं. कनिष्ठ न्यायालयात आम्ही जामीन याचिका दाखल केली. साडेतीन महिने एनसीबीनं टाळाटाळ केली. पण शेवटी जामीन मिळाला”, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

निदान महागाईची जुमलेबाजी तरी करु नका;शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

Mumbai: State govt upgrades minister Nawab Malik’s security after threat calls

“२७ तारखेला एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात समीर खान आणि त्याच्यासोबतच्या दोन इतर आरोपींना साडेआठ महिने जेलमध्ये राहिल्यानंतर जामीन दिला गेला. काल सकाळी ११ वाजता कोर्टाच्या ऑनलाईन पोर्टलवर तो आदेश अपलोड झाला. माझ्या जावयाला साडेआठ महिने जेलमध्ये राहावं लागलं. माझी मुलगी मानसिक धक्क्यामध्ये होती. त्यांच्या दोन लहान मुलांवर परिणाम झाला”, असं देखील नवाब मलिक यावेळी म्हणाले.

Maratha Reservation

“सर्व चॅनल्सवर मोठ्या प्रमाणावर गांजा मिळाल्याचं दाखवलं जात होतं. पण घराच्या तपासणीत असं काहीही सापडलं नाही. पण माध्यमांना तसं सांगितलं गेलं. लोकांना बदनाम करण्याचं काम एनसीबी करत आहे. एनसीबी बनाव करते. या प्रकरणात एनसीबीचा हा सगळा बनाव उघड झाला आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी