35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयजिथे भाजप विरोधी सरकार निर्माण झाले त्या सरकारला बदनाम केले जात आहे,...

जिथे भाजप विरोधी सरकार निर्माण झाले त्या सरकारला बदनाम केले जात आहे, राष्ट्रवादी नेत्याचा भाजपला खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई : ईडी, एनआयए आणि एनसीबीसारख्या यंत्रणाचा वापर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांविरुद्ध केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. परंतु आमचे नेते या कारवाईंना घाबरणारे नाही उलट सरकार आणखी भक्कम होत आहे, असे मलिक म्हणाले (NCP leader slammed the central BJP government).

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या यावर मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या कंपन्यांवर कारवाया केल्या जात आहे. त्यावरून हे स्प्ष्ट होत आहे की, या राज्यात किंवा जिथे जिथे भाजप विरोधी सरकार निर्माण झाले आहे त्या सरकारला भाजप टार्गेट करून बदनाम करत आहे. जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये होती तीच परिस्थिती राज्यात निर्माण करण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

मंदीरे उघडली, अन् भाजपचा ढोंगी चेहरा चव्हाट्यावर आला

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’

तसेच जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल वेगळा लागला असला तरी जनतेने ७० टक्के जागा या महाविकास आघाडीतील पक्षांना दिल्या आहेत. त्यामुळे आम्हाला जितकं भाजप टार्गेट करेल बंगालसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल असा इशारा मलिक यांनी भाजपला केला आहे.

11 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद राजकीय नसून संवेदनशीलतेसाठी, आरोपींना अटक का नाही?, सरकार कुणाला वाचवतंय?

Baseless: NCB refutes Nawab Malik’s allegations calling Aryan Khan’s arrest ‘a frame-up’

जिथे भाजप विरोधी सरकार निर्माण झाले त्या सरकारला बदनाम केले जात आहे, राष्ट्रवादी नेत्याचा भाजपला खोचक टोला

लखीमपूर घटनेनंतर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी सरकारने ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यातील जनता केंद्रातील भाजपच्या जुलमी सरकार विरोधात जोरदार पाठिंबा देणार असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला आहे. पत्रकारांशी मलिक संवाद साधत होते त्या वेळी ते बोलत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी