32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयमुंडे भगिनी केंद्रीय भाजपवर नाराज नाहीत; उगाच त्यांना बदनाम करू नका; देवेंद्र...

मुंडे भगिनी केंद्रीय भाजपवर नाराज नाहीत; उगाच त्यांना बदनाम करू नका; देवेंद्र फडणवीस

टीम लय भारी

मुंबई :- केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार होते. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतून डॉ. प्रीतमताई मुंडे यांचे नाव वगळण्यात आले. यामुळे मुंडे भगिनी केंद्रीय भाजपवर  नाराज असल्याचे चर्चांना उधाण आले. मुंडे भगिनी केंद्र भाजपवर नाराज नाहीत, उगाच त्यांना बदनाम करू नका, अशी प्रतिक्रिया विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे (Devendra Fadnavis said Munde Bhagini not angry with BJP, so dont discredit them.)

देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकमध्ये मीडियाशी संवाद साधला. यावेळी प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याची चर्चा आहे, असे फडणवीस यांना विचारण्यात आले होते. त्यावर फडणवीस भडकले. तुम्हाला कोणी सांगितले त्या नाराज आहेत. कृपा करून कारण नसतान त्यांना बदनाम करू नका.

प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं, मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतून प्रीतमताईंचे नाव वगळले!

नवे आले जुने गेले; केंद्रीय मंत्रिमंडळात 43 नवे चेहरे तर जुन्या 12 चेहऱ्यांना डच्चू

भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचे सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत (Devendra Fadnavis has said that Munde should not slander her sister by saying that she is upset).

यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रातील चार लोकांना संधी मिळाली आहे. खातीही चांगली मिळाली आहेत. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला चांगले खाते मिळाले आहे. त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल, असे सांगतानाच नाशिक जिल्ह्याला 50 वर्षानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळाले, असे त्यांनी सांगितले.

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

Devendra Fadnavis says Maharashtra govt plans to give 5,000 new liquor licences

Devendra Fadnavis said Munde Bhagini not angry with BJP
मुंडे भगिनी आणि देवेंद्र फडणवीस

यानंतर देवेंद्र फडणवीस यांना नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारामुळे युतीच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला का? प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. एक तर चर्चांवर कोणतेही निर्णय होत नसतात. चर्चा वेगवेगळ्या प्रकारे होतात. राणेंना त्यांच्या क्षमतेवर मंत्रिमंडळात घेतले आहे. बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यात आला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत जे काही बोलायचे ते ईडी बोलेल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करत असतो. भाजपमध्ये अशा प्रकारे विन्डिक्टिव्ह काम करण्याची प्रथा नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी