33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयशिवसेनेला पाठिंबा देण्याची राष्ट्रवादीची तयारी; कॉंग्रेसला सोबत घेऊन निर्णय घेणार

शिवसेनेला पाठिंबा देण्याची राष्ट्रवादीची तयारी; कॉंग्रेसला सोबत घेऊन निर्णय घेणार

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : पर्यायी सरकार देण्याची आमची तयारी आहे. तशी चर्चा कोअर कमिटीच्या बैठकीत आज झाली आहे. मात्र कॉंग्रेसच्या निर्णयाची आम्ही वाट पाहात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आज सकाळी झाली आणि कॉंग्रेसची दिल्लीत बैठक झाली असून त्यांची दुसरी बैठक आज दुपारी ४ वाजता महाराष्ट्रातील नेत्यांसोबत होत आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पहात आहोत. कॉंग्रेसचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही अशी माहितीही नवाब मलिक यांनी यावेळी दिली.

‘लय भारी’ बातम्या वॉट्सअपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

हे सुद्धा वाचा

महत्वाची बातमी : उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला

काँग्रेस, राष्ट्रवादीने मागे हटू नये, शिवसेनेसोबत एकत्र सरकार बनवावे : खासदार संजय राऊत यांचे आवाहन

मोठी बातमी : शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा, शिवसेनेची एनडीएसोबत काडीमोड

आज ४ वाजता कॉंग्रेसची बैठक झाल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत दुसरी बैठक घेणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीला जाणार नाहीत असेही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी