33 C
Mumbai
Tuesday, May 28, 2024
Homeमुंबईमहत्वाची बातमी : उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यात चर्चा

महत्वाची बातमी : उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यात चर्चा

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज आहे. त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यामध्ये नुकतीच बैठक पार पडली. वांद्रे येथील ताज लॅण्ड या हॉटेलमध्ये ही बैठक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीसाठी शरद पवार यांच्यासह अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे इत्यादी महत्वाचे नेते उपस्थित होते, तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे उपस्थित होते अशी माहिती या सूत्रांनी दिली.

सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी शिवसेनेला आज सायंकाळी 7.30 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. तत्पुर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा निर्णय होणे अपेक्षित आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कशा पद्धतीने पाठिंबा देईल. दोन्ही काँग्रेस थेट सरकारमध्ये सहभागी होतील की बाहेरून पाठिंबा दिला जाईल. तिन्ही पक्षांचे सरकार स्थापन झाले तर ‘किमान समान कार्यक्रम’ काय असेल. मंत्रीमंडळाचे वाटप कसे असेल. इत्यादी विविध मुद्द्यांवर शिवसेना व दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यात ही चर्चा झाल्याचे समजते. या चर्चेचा तपशील अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही.

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत चार वाजता निर्णय अपेक्षित

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत आज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन स्वतंत्र बैठका पार पडल्या. काँग्रेसने महाराष्ट्रातील त्यांच्या प्रमुख नेत्यांना दिल्लीला तातडीने बोलावून घेतले आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील व महाराष्ट्रातील नेत्यांची दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा द्यायचा किंवा नाही याबाबत निर्णय होईल. थेट सरकारमध्ये सहभागी व्हायचे की बाहेरून पाठिंबा द्यायचा याबाबतही या बैठकीत निश्चित होईल असे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस, राष्ट्रवादीने मागे हटू नये, शिवसेनेसोबत एकत्र सरकार बनवावे : खासदार संजय राऊत यांचे आवाहन

मोठी बातमी : शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा, शिवसेनेची एनडीएसोबत काडीमोड

भाजप शिवसेनेच्या पाठी फिरतेय, अन् शिवसेना काँग्रेस – राष्ट्रवादीकडे भीक मागतेय : मनसेचा निशाणा

फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत, याचा विनोद तावडेंना आनंद, मनसेने उडविली खिल्ली

शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचे निमंत्रण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी