31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeराजकीयNCPvsBJP : ‘गृह सचिव गुप्ता यांनी ते पत्र स्वतःहूनच दिले, शरद पवार...

NCPvsBJP : ‘गृह सचिव गुप्ता यांनी ते पत्र स्वतःहूनच दिले, शरद पवार – देशमुखांची मान्यता नाही’

टीम लय भारी

मुंबई : वाधवा कुटुंबियांना महाबळेश्वरला जाण्याबाबतचे पत्र गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी स्वतःहूनच दिले आहे. शरद पवारांचा ( NCPvsBJP ) त्यात कसलाही हात नाही. पण पवारांचे नाव घेतल्याशिवाय भाजपचे ( NCPvsBJP ) दुकान चालत नाही, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेत्यांना हाणला आहे.

‘कुठला तरी अधिकारी कोणाला तरी पत्र देतो, अन् ती लोकं महाबळेश्वरला जातात. त्यात कुणाचा काही संबंध नाही. ते सगळं त्या अधिकाऱ्याने स्वतःच्या मनाने केले आहे. पण भाजपच्या नेत्यांनी ( NCPvsBJP ) शरद पवारांचे नाव घेतले आहे. पवारांचे नाव घेतल्याशिवाय दुकान चालणार नाही हे भाजपच्या ( NCPvsBJP ) नेतृत्वाला माहित आहे. पवार साहेबांचा काय संबंध. गेली ५० वर्षे तुम्ही हेच करीत आहात.’ असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

आव्हाड पुढे म्हणाले की, तुम्ही कौतुक या गोष्टीचं करा की, या पत्राची माहिती मिळताच गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून रात्री १२ वाजता त्या अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तुम्ही ( भाजप नेते ) झोपला होता. हे सक्षम सरकार आहे. पवार साहेबांचे ( NCPvsBJP ) नेतृत्व आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. पण आमचे भिष्माचार्य पवार साहेब आहेत. असले फालतू लाड ते करीत नाहीत.

भाजपवर ( NCPvsBJP ) पलटवार करत आव्हाड पुढे म्हणाले की, केंद्राचे एक पत्र बाहेर आले आहे. आमच्या परवानगीशिवाय राज्य सरकारने पीपीई कीट, मास्क, मेडीकलचे सामान घ्यायचे नाही असे त्या पत्रात म्हटले आहे. पीपीई कीट नाही म्हणून लोकं मरत आहेत. डॉक्टर, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. राजकारण ( NCPvsBJP ) नको म्हणून आम्ही आतापर्यंत आम्ही तोंड बंद ठेवले होते. आता भाजप नेत्यांनीच सांगावे की, केंद्राने हे का केले. महाराष्ट्राबद्दल ( NCPvsBJP ) त्यांच्या मनात किंतु आहे का ? केंद्राचे हे पत्र ताबडतोब मागे घ्या, अशी मागणी भाजपने पत्रकार परिषदेत करावी, असेही आवाहन आव्हाड यांनी यावेळी केले.

‘आमच्या डॉक्टरांची आम्हाला काळजी आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची आम्हाला काळजी आहे. महाराष्ट्राचा सगळा खजिना आम्ही ‘कोरोना’साठी वापरायला तयार आहोत. पण केंद्राने ( NCPvsBJP ) असे पत्र काढून महाराष्ट्राला अडचणीत टाकले आहे. नको ते संबंध जोडून राजकारण करू नका’ असा इशाराही आव्हाड यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी ‘अहिल्या आरोग्य हेल्पलाइन’ची मोफत सेवा!

Lockdown21 : उद्धव ठाकरे – अनिल देशमुखांची धडक कारवाई, बेजबाबदार IPS गुप्तांना पाठविले सक्तीच्या रजेवर

Wadhawan : गृह सचिव अमिताभ गुप्तांचा बेफिकीरपणा, बिल्डरला 23 जणांसह महाबळेश्वरला जाण्यासाठी दिली परवानगी

तबलिगींचा तो व्हिडीओ खोटा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी