33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमंत्रालयWadhawan : गृह सचिव अमिताभ गुप्तांचा बेफिकीरपणा, बिल्डरला 23 जणांसह महाबळेश्वरला जाण्यासाठी...

Wadhawan : गृह सचिव अमिताभ गुप्तांचा बेफिकीरपणा, बिल्डरला 23 जणांसह महाबळेश्वरला जाण्यासाठी दिली परवानगी

टीम लय भारी

मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू आहे. कुणालाही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी संधी नाही. परंतु मुंबईतील मातब्बर असलेल्या वाधवा ( Wadhawan ) बिल्डरच्या कुटुंबातील तब्बल २३ जणांना खंडाळ्यावरून महाबळेश्वरला जाण्यासाठी राज्याच्या गृह सचिवांनी परवानगी दिली. पाच गाड्यांनाही परवानगी दिली.

आपल्या उच्च पदाचा गैरवापर करून गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवा ( Wadhawan ) बिल्डरला लेखी पत्र दिल्याचे समोर आल्याचे मोठी खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, जगभरातील मातब्बर मंडळीसुद्धा लॉकडाऊनमुळे घरात आहेत. महाराष्ट्रात व देशातील मंत्री, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनीही स्वतःला एकाच ठिकाणी बंद करून घेतले आहे. असे असताना तब्बत २३ सदस्यांची ( Wadhawan ) ‘वरात’ खंडाळ्यावरून महाबळेश्वरला वाधवा बिल्डरने ( Wadhawan ) नेली. त्यासाठी गृह विभागाच्या प्रधान सचिव गुप्ता यांनी स्पेशल परवानगी दिली.

Wadhwan
अमिताभ गुप्ता यांनी दिलेले हेच ते वादग्रस्त पत्र

अमिताभ गुप्ता यांनी या २३ जणांची पत्रात नावे लिहिली आहेत. ‘ हे २३ जण माझे कौटुंबिक स्नेही आहेत. या २३ जणांवर कौटुंबिक तातडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ते खंडाळ्यावरून महाबळेश्वरला जात असल्याचे गुप्ता’ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. पाच गाड्यांचे क्रमांकही गुप्ता यांनी पत्रात नमूद केले आहेत.

धक्कादायक म्हणजे, खंडाळा व महाबळेश्वर ही दोन्हीही ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. पर्यटनाच्या ठिकाणी या २३ सदस्यांची ( Wadhawan ) कसली तातडीची गरज निर्माण झाली होती. तातडीच्या गरजेसाठी एखादी – दुसरी व्यक्ती जात असते. पण गुप्ता यांनी तब्बल २३ व्यक्तींना ( Wadhawan ) कशीकाय परवानगी दिली.

वाधवा बिल्डरची ( Wadhawan ) वादग्रस्त प्रतिमा आहे. डीएचएफएल नावाची त्यांची कंपनी आहे. काही घोटाळ्यांत त्यांचे यापूर्वी नाव आले होते. अशा वादग्रस्त व्यक्तीसोबत ( Wadhawan ) अमिताभ गुप्ता यांनी ‘कौटुंबिक स्नेह’संबंध असल्याचे लेखी नमूद केले आहे. ‘सामान्य लोकांसाठी लॉकडाऊनचे नियम, परंतु धनाढ्य वाधवासाठी ( Wadhawan ) सवलत’ अशी भूमिका गृह विभागाच्या प्रधान सचिवांनीच घेतल्याने सामान्य लोकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, वाधवा प्रकरणी मान्यता दिलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल असे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केले आहे.

हे सुद्धा वाचा

Rajesh Tope : मुंबईतील लॉकडाऊन आता अधिक कडक, एसआरपीएफचे जवान तैनात करणार

Covid19 : ‘नरेंद्र मोदींनी डॉ. आंबेडकर जयंती कशी साजरी करावी याबाबत देशाला संबोधित करावे’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी