31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयआरक्षणाच्या मुद्द्यावरून निलेश राणे यांची संभाजी राजेंवर टीका

आरक्षणाच्या मुद्द्यावरून निलेश राणे यांची संभाजी राजेंवर टीका

टीम लय भारी

मुंबई :-  सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाज नाराज झाल आहे. मराठा समाज आणि संभाजी राजे (Sambhaji Raje) आक्रमक झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजे, मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिला नाही, अशी टीका निलेश राणे यांनी संभाजी राजेंवर केली आहे (Nilesh Rane has made such a criticism on Sambhaji Raje).

खासदार संभाजी छत्रपती (MP Sambhaji Chhatrapati) यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. ही भेट सकारात्मक झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावरून निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करून संभाजीराजेंवर (Sambhaji Raje) टीका केली आहे. संभाजीराजेंच्या (Sambhaji Raje) मनात काय भलतच दिसत आहे. पवार साहेब व महाविकास आघाडीच्या जवळ जायचे असेल तर खुशाल जावे. पण, मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही, असा इशाराही निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर संभाजीराजेंची शरद पवारांकडे विनंती

मराठा आरक्षणाबाबत भाजपला कळकळ आहे असा दिखावा : अशोक चव्हाणांचा खोचक टोला

‘Black fungus’ declared an epidemic in Delhi as city reports 153 more cases

काय झाले होते भेटीत?

काल संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. गेल्या तीन-चार दिवसांपासून मी राज्यभरात फिरून मराठा समाजाच्या भावना जाणून घेत आहे. आज शरद पवार यांना भेटलो तेव्हा मराठा समाज किती अस्वस्थ आणि दु:खी आहे, हे मी त्यांच्या कानावर घातले. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे या सगळ्या नेत्यांनीही एकत्र आले पाहिजे. शरद पवार यांनी या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन. त्यानंतर शुक्रवारी रात्री 8 वाजता मी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन माझी भूमिका जाहीर करेन, असे संभाजीराजे (Sambhaji Raje) म्हणाले होते.

मेटेंची टीका

संभाजीराजे (Sambhaji Raje) आणि पवारांच्या भेटीवर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी टीका केली होती. लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकतो. परंतु, शरद पवार यांचा मराठा आरक्षणाविषयीचा आजपर्यंतचा दृष्टीकोन पाहता या भेटीतून काहीही साध्य होणार नाही. मराठा आरक्षण, नोकऱ्या आणि सारथी या महत्वाच्या विषयांवरची चर्चा 10 मिनिटांत कशी पूर्ण झाली? पण आता संभाजीराजे चर्चा सकारात्मक झाली, असे म्हणत असतील तर पुढे काय होते ते बघू, असे मेटे म्हणाले होते. त्यानंतर निलेश राणेंनी (Nilesh Rane) टीका केल्याने संभाजीराजे (Sambhaji Raje) आणि भाजपमध्ये मतभेद वाढत असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी