31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयमराठा आरक्षणाबाबत भाजपला कळकळ आहे असा दिखावा : अशोक चव्हाणांचा खोचक टोला

मराठा आरक्षणाबाबत भाजपला कळकळ आहे असा दिखावा : अशोक चव्हाणांचा खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :-  सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द केले आहे. मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य नाही आहे. त्यामुळेच मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) भाजपला कळकळ आहे असा निव्वळ दिखावा करून त्यांना फक्त राजकारण करायचे आहे अशा शब्दात मराठा आरक्षण (Maratha reservation) उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपाला खोचक टोला हाणला आहे (Ashok Chavan has hit the BJP hard).

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी मराठा आरक्षणाबाबतची (Maratha reservation) भाजपाची दुतोंडी भूमिका पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. त्यांनी आज मांडलेले मुद्दे अतिशय गंभीर आहेत. आरक्षणाबाबत भाजपाचा कळवळा दिखाऊ असून या मुद्द्यावर त्यांना केवळ राजकारणच करायचे आहे, हे स्पष्ट आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर संभाजीराजेंची शरद पवारांकडे विनंती

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे राज ठाकरेंची भेट घेणार

Covid: There’s a ‘political effort’ to show Centre in a certain way, claims foreign minister

मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरून भाजपावर निशाणा साधत सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, “एके ठिकाणी मराठा आरक्षण (Maratha reservation) मिळाले पाहिजे असा देखावा करायचा व दुसरीकडे आपल्याच कार्यकर्त्यांना न्यायालयात विरोध करायला सांगायचे‌? भाजपानेच मराठा आरक्षणाविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवली का? अनुप मरार कोण आहे? संघ कनेक्शन काय? याचे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील व फडणवीस यांनी द्यावे.”

तसेच “मराठा समाजाने कोल्हापूरला ज्या संस्थेविरोधात आंदोलन केले त्या मराठा आरक्षणाला (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयात निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संस्थेची स्थापना भाजपाच्या इशाऱ्यावर नागपूर येथे २०१९/२० करण्यात आली का? या संस्थेचे विश्वस्त नागपूरचे असून भाजपा आणि संघाशी संबंधित आहेत.” असे देखील सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी सांगितले आहे.

“कंगना राणावतला भेटणारे पंतप्रधान छत्रपती संभाजी राजेंना का भेटत नाहीत? या साध्या प्रश्नाचे उत्तर प्रविण दरेकरांनी व भाजपाला देता येत नाही. असो! उद्या पुन्हा मी भाजपाची पोलखोल करुन मराठा आरक्षणाविरुध्द भाजपाचा कुटील डाव उघड करणार आहे. त्याही प्रश्नापासून पळ काढतात का? ते पाहू.” असे सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी काल ट्विटद्वारे म्हटले होते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी