35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeराजकीयAmit Shah Bihar Visit: ‘नितीश कुमारांनी भाजप आणि बिहारच्या जनतेशी विश्वासघात केला’

Amit Shah Bihar Visit: ‘नितीश कुमारांनी भाजप आणि बिहारच्या जनतेशी विश्वासघात केला’

दोन दिवसीय बिहार दौऱ्यावर असलेले अमित शहा म्हणाले की, नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या मांडीवर बसण्यासाठी आमचा विश्वासघात केला. सीमांचल भागातील जनता नितीशकुमारांना चोख प्रत्युत्तर देईल. राजकीय आघाड्या बदलून नितीश कुमार पंतप्रधान होऊ शकतात का? असा प्रश्न त्यांनी नितीशकुमारांना केला.

केंद्रीय गृहमंत्री (Home Minister) अमित शहा (Amit Shah) यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आणि दावा केला की, म्हणाले की, नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या मांडीवर बसण्यासाठी आमचा विश्वासघात केला. सीमांचल भागातील जनता नितीशकुमारांना चोख प्रत्युत्तर देईल. राजकीय आघाड्या बदलून नितीश कुमार पंतप्रधान होऊ शकतात का? असा प्रश्न त्यांनी नितीशकुमारांना केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुम्हाला मुख्यमंत्रीपद देण्याचे वचन दिल्याने भाजपने शिष्टाई दाखवली. पण, लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यावर, पुढचा पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही आमची फसवणूक केली. बिहारची जनता तुम्हाला ओळखते. त्यांनी तुम्हाला जनतेचा विकास करण्याची संधी दिली होती परंतु तुम्ही त्यांचा सुद्धा विश्वाघात केला, पण आता ते तुम्हाला ओळखतात,” असे शाह पुढे म्हणाले.

पूर्णिया येथील सभेला संबोधित करताना, भाजपचे ज्येष्ठ नेते शाह पुढे म्हणाले, “ते [JD(U)-RJD] म्हणतात की, मी येथे अशांतता निर्माण करण्यासाठी आलो आहे. मी येथे अशांतता निर्माण करण्यासाठी आलो नाही. त्यासाठी लालू प्रसाद यादव पुरेसे आहेत. आता नितीशजीं लालूजींच्या मांडीवर बसले आहे. परंतु मी तुम्हाला एक आश्वासन देतो की, सीमावर्ती जिल्हे भारताचा एक भाग आहेत त्यामुळे घाबरू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

हे सुद्धा वाचा –

MS Dhoni: महेंद्र सिंगने क्रिकेट खेळताना राग कधीही का आला नाही याचे गुपित केले उघड

Congress President Election: गांधी परिवारातून कोणीही काँग्रेसचा अध्यक्ष बनणार नाही – अशोक गहलोत

Dussehra Melava: दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार; न्यायालयाचा मोठा निर्णय

मागच्या महिन्यात बिहारचे मुख्यमंत्री आणि JD(U) प्रमुख नितीश कुमार यांनी RJD सोबत युती करण्यासाठी भाजपशी संबंध तोडल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांची बिहार मध्ये येण्याची ही पहिलीच वेळ होती.

“नितीश कुमार पंतप्रधान होण्यासाठी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दला सोबत गेले. त्यांनी बिहार आणि तेथील जनादेशाचा विश्वासघात केला,” अमित शहा म्हणाले.

केंद्रीय मंत्री शुक्रवारी सकाळी 11 वाजता पूर्णियातील चुनापूर एअर फोर्स स्टेशनवर उतरले, तेथून ते मेगा ‘जनसभा सभे’ला संबोधित करण्यासाठी रंगभूमी मैदानावर गेले. जनभावना सभेला संबोधित केल्यानंतर अमित शहा किशनगंजला रवाना झाले, जिथे त्यांनी राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीवर पक्षातील सर्व खासदार, आमदार विधान परिषदेचे सदस्य आणि संघटनात्मक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी