35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाMS Dhoni: महेंद्र सिंगने क्रिकेट खेळताना राग कधीही का आला नाही याचे...

MS Dhoni: महेंद्र सिंगने क्रिकेट खेळताना राग कधीही का आला नाही याचे गुपित केले उघड

जेव्हा एखादा खेळाडूने झेल सोडला किंवा खराब क्षेत्ररक्षण केले तर त्या खेळाडूने असे का केले असावे याची कारणे शोधण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्ही मैदानावर राग व्यक्त केल्याने गोष्टी साध्य होत नाहीत. मैदानामध्ये तब्बल 40000 प्रेक्षक सामना पाहात असतात. त्याशिवाय, लाखो लोक मोबाइल किंवा टीव्हीवर सामना बघत असतात. त्यामुळे खेळाडूंवर प्रचंड दडपण असते त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त दडपण टाकणे मला योग्य वाटत नाही.

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनीची (Mahendra Singh Dhoni) तो खेळत असताना ‘कॅप्टन कुल’ अशी इमेज होती. त्याच्या शांत व संयमी स्वभावामुळे अटीतटीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला अनेकदा विजय मिळवता आला. प्रत्येक खेळामध्ये खेळाडू आपल्या भावना खुलेपणाने मैदानातमध्ये व्यक्त करतात. परंतु, धोनी एक असा अपवादात्मक खेळाडू होता तो भारतीय संघ जिंकला किंवा पराजित झाला तरी त्याच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असायचे. त्यामुळे त्याचा विलक्षण स्वभाव हा क्रिकेट समीक्षकांपासून ते क्रिकेट चाहत्यापर्यंत नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका परीसंवादामध्ये धोनीने स्पष्ट केले की, मैदानावार खेळत असताना त्याला सुद्धा इतर खेळांडूप्रमाणे  आनंद किंवा व्देष येतो. परंतु तो स्वत:च्या भावना नियंत्रित करतो.

खेळाडंच्या मैदानावरील वर्तनावर भाष्य करताना धोनी म्हणाला की, प्रामाणिकपणे बोलायचे झाल्यास मला असे वाटते की, कोणताही खेळाडू झेल सोडण्यसाठी किंवा खराब क्षेत्ररक्षण करावे या उद्देशाने मैदानात प्रवेश करत नाही.

जेव्हा एखादा खेळाडूने झेल सोडला ‍किंवा खराब क्षेत्ररक्षण केले तर त्या खेळाडूने असे का केले असावे याची कारणे शोधण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्ही मैदानावर राग व्यक्त केल्याने गोष्टी साध्य होत नाहीत. मैदानामध्ये तब्बल 40000 प्रेक्षक सामना पाहात असतात. त्याशिवाय, लाखो लोक मोबाइल किंवा टीव्हीवर सामना बघत असतात. त्यामुळे खेळाडूंवर प्रचंड दडपण असते त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त दडपण टाकणे मला योग्य वाटत नाही.

एखादया खेळाडूने पूर्ण प्रयत्न करूनही झेल सोडला तर मला त्याबद्दल जास्त वाईट वाटत नाही. परंतु मी हे सुद्धा पाहायचो की सराव करताना त्याने किती झेल पकडले. इतरांप्रमाणे मी ही माणूसच आहे. इतर लोकांप्रमाणे मलाही भावना आहेत. आम्ही क्रिकेट खेळत असताना देशाचे प्रतिनिधीत्व करतो त्यामुळे खराब प्रदर्शन केल्यानंतर इतरांपेक्षा आम्हाला त्याचे जास्त दु:ख होते. परंतु, आम्ही नेहमी आमच्या भावनांवर आवर घालण्याचा प्रयत्न करतो, असे धोनीने नमूद केले.

हे सुद्धा वाचा –

Viral Video : दारू पिलेल्या प्राध्यापकाचा विद्यापीठात राडा!

ODI IND vs AUS : भारताच्या पुनरागमनात पावसाचे विघ्न! वाचा काय सांगतोय हवामानाचा अंदाज

ODI IND vs AUS : भारताच्या पुनरागमनात पावसाचे विघ्न! वाचा काय सांगतोय हवामानाचा अंदाज

तो पुढे म्हणाला की, लोक जेव्हा एखादा सामना बघत असतात तेव्हा खेळाडूंनी कशाप्रकारे खेळावे यावर भाष्य करणे खूप सोपे असते. आम्ही ज्‍याप्रमाणे देशाचे प्रतिनिधीत्व करतो त्याप्रकारे ‍विरोधी संघाचे खेळाडू सुद्धा त्यांच्या देशाचे प्रतिनिधीत्व करत असतात. दोन्ही संघ आपल्या देशासाठी चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सामन्यामध्ये चढ-उतार येणे ही स्वाभाविक गोष्ट आहे.

धोनीने शेवटी क्रिकेट चाहत्यांना आवाहन केले की, क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारामध्ये खेळाडूंना पाठिंबा देणे खूप महत्त्वाचे आहे कारण प्रत्येक खेळाडू हा आपल्या संघाला जिंकवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो.

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये भारतीय क्रिकेट संघाने 2007 साली टी-20 विश्वचषक स्पर्धा, 2011 सालची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा व आयसीसी टेस्ट रैकींगमध्ये भारतीय कसोटी संघाला प्रथम स्थान मिळवून देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी