31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयओबीसींवर फारसा विश्वास नाही : जितेंद्र आव्हाड

ओबीसींवर फारसा विश्वास नाही : जितेंद्र आव्हाड

टीम लय भारी

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानं आता वाद निर्माण झाला आहे.ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ओबीसी एकीकरण समिती तर्फे आयोजित सन्मान सावित्रीच्या लेकींचा या कार्यक्रमासाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री हे मान्यवर म्हणून उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आव्हाड यांनी ओबीसी आरक्षणाचा विषय मांडला आहे.(OBC s, Not much faith in, Jitendra Awhad)

‘खरं तर ओबीसींवर फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला महार समाज होता. कारण ओबीसींनी लढायचंच नव्हतं. ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पडगा इतका आहे की आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येऊ देत नसत. ते हे सर्व विसरले आणि ताता आरक्षणासाठी पुढे येतात. नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे, केंद्र सरकारशी दोन हात करावे लागतील’, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.

“कालीचरण बाबाला ताबडतोब अटक करा आणि ठेचून काढा,” जितेंद्र आव्हाड संतापले

…तेव्हा नथुरामच्या चिल्ल्या पिल्यांना काय वाटतं याच्याशी आपलं काही संबंध नाही : जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला

आव्हाडांच्या या वक्तव्यावर आता भाजपा नेते चंद्रशेखर बावळकुठे आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड नेहमीच आपल्या विधानांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करत असतात. महराष्ट्रात सगळ्या समाजात एकवाक्यता आहे. अशात ओबीसींना ज्या प्रकारे हिनवण्याचा प्रकार आव्हाड यांनी केला आहे तो अतिशय निंदनीय आहे. ओबीसी समाज त्यांना कधी माफ करणार नाही. यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे पाहावं लागेल. त्यांनी अजून डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही, असा इशाराच बावनकुळे यांनी आव्हाड यांना दिला आहे.

‘राजकारण आपली पोळी भाजण्यासाठी ते असं वक्तव्य करतात. शरद पवार यांनी आता सांगितलं पाहिजे की ते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचं समर्थन करतात का? सर्व समाज एकमेकांना साथ देत आहेत, मदत करत आहेत, अशावेळी असं वक्तव्य करुन ते तेढ निर्माण करत आहेत. त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे’, अशी मागणीही बावनकुळे यांनी केलीय.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूका पुन्हा लांबणार..?

NCP minister Jitendra Awhad bucks big fat wedding trend as daughter registers marriage in simple ceremony at home

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी