29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeटॉप न्यूजएकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण

एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण

टीम लय भारी

ठाणे : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 86 हजार 508 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 1129 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आता शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.( Eknath Shinde also contracted corona)

त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. हाराष्ट्रातील जवळपास 20 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त राजकीय नेते कोरोनाबाधित झाले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली होती. त्यात आज आणखी एका मंत्र्याची भर पडली आहे.

नवी मुंबईच्या मेट्रोबद्दल एकनाथ शिंदे यांचा आदेश

युवासेनेच्या सचिवांना कोरोनाची लागण

ट्विट करत ते म्हणाले की, ‘काल मी माझी कोविड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी,

ही विनंती..कोरोनाच्या या लाटेत राजकीय नेते आणि मंत्र्यांमध्ये कोरोनाची लागण जास्त प्रमाणात झालेली दिसून येत आहे. कालच भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आले.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह

Navi Mumbai: No property tax up to 500 square foot residential units, assures Maharashtra minister Eknath Shinde

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी