30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयआमदार समीर कुणावार यांनी उपलब्ध करुन दिले ऑक्सिजन सिलेंडर

आमदार समीर कुणावार यांनी उपलब्ध करुन दिले ऑक्सिजन सिलेंडर

निखिल ठाकरे

हिंगणघाट :-  आमदार समीर कुणावार यांनी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिल्यानंतर येथील डॉ. मरोठी यांचे अरिहंत क्रिटिकल केअर सेंटर येथे कोरोना रुग्णालय सुरु झाले आहे. या करिता शहरातील खाजगी उद्योजकांनी मदतीचा हात दिला आहे.

हिंगणघाट तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत कोविड रुग्णालयातील खाटा सुद्धा कमी पडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दिनांक १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी वर्धा यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी आमदार समिर कुणावार सहित जिल्हातील सर्व आमदार, खासदार रामदास तडस, तसेच जिल्ह्या रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार कुणावार यांनी हिंगणघाट येथे खाजगी कोविड रुग्णालय सुरु करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली. तसेच हिंगणघाट येथील काही खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांची कोविड रुग्णालय सुरु करण्याची तयारी असल्याचेही यावेळी सांगितले.

जिल्ह्याधिकारी वर्धा यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितल्यानंतर हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला. यानुसार डॉ. मरोठी यांचे अरिहंत क्रिटिकल सेंटर मध्ये १० खाटाचे कोरोना रुग्णालयाला मंजूरी प्रदान करण्यात आली. परंतु ऑक्सिजन सिलेंडरचा मोठा तुटवडा असल्याने रुग्णालय कार्यान्वित करण्याची गंभीर समस्या निर्माण झाली. तेव्हा आमदार कुणावार यांनी विविध उद्योजकांशी संपर्क साधून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. शहरातील उद्योजकानी लगेच प्रतिसाद देत तब्बल तीस औधोगिक ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिले. यात गिमाटेक्स इंडस्ट्रीज, पी.वी टेक्सटाइल्स जाम, सगुना फुड्स वनी, दुलानी मेडिकल्स, वरुण राठी यांनी मदतीचा हात देऊन सिलेंडरचा पुरवठा केला. या बद्दल आमदारं कुणावार यांनी सर्व उद्योजकांचे आभार मानले. आमदार कुणावार यांनी स्व:ता रुग्णालयात जाऊन पाहणी केली. यावेळी अरिहंत क्रिटिकल केअर सेंटरचे संचालक डॉ. राहुल मरोठी, डॉ. मधुसूदन गोयनका, माजी नगरसेवक किरण वैद्य, संमाजसेवी संजय बोथरा, पुंडलिक बकाने उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी