33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeराजकीयPMमोदी 25 डिसेंबरला शेतकऱ्यांशी साधणार संवाद !

PMमोदी 25 डिसेंबरला शेतकऱ्यांशी साधणार संवाद !

टिम लय भारी

मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शुक्रवारी 25 डिसेंबरला पुन्हा शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. उत्तर प्रदेशातील अवधच्या शेतकऱ्यांशी (Uttar Pradesh Farmers) पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन कृषी कायद्यांचे (Farm Bill) फायदे सांगतील. यासह उत्तर प्रदेश भाजपचे कार्यकर्ते केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांचे पत्र घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना देतील.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी अयोध्येत शेतकऱ्यांसोबत जोडलं जाण्याचा भव्य कार्यक्रम होणार आहे. अयोध्येत एकूण 377 ठिकाणी तर संपूर्ण उत्तर प्रदेशात सुमारे अडीच हजार ठिकाणी शेतकऱ्यांना जोडलं जाण्याच्या प्रक्रियेसाठी कार्यक्रम होणार आहे. 25 डिसेंबरला उत्तर प्रदेशातल्या अडीच हजार ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच ते कृषी कायद्याचं महत्व शेतकऱ्यांना सांगणार आहेत. 25 डिसेंबरला किसान सन्मान निधीही वितरित केला जाणार आहे. उत्तर प्रदेशात या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान, या कार्यक्रमावरुन विरोधक पुन्हा एकदा मोदीवर टीका करण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीच्या सिमेवर पंजाब आणि हरयाणा या राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. अशातच त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी पंतप्रधान उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे हा मुद्दा पुढे करुन विरोधक आक्रमक होऊ शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी