31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयप्रकाश आंबेडकराचा हिजाब वादावरुन भाजपावर निशाणा

प्रकाश आंबेडकराचा हिजाब वादावरुन भाजपावर निशाणा

टीम लय भारी

मुंबई : कर्नाटकमध्ये सुरू असलेला हिजाब वाद वाढतच चालला आहे. कर्नाटक सरकारने आदेश दिले आहेत की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांनी ठरवून दिलेला गणवेश परिधान करावा. यावरूनच हा वाद पेटला आहे. हिजाब घालून घोषणाबाजी करणारी मुस्कानही देशातल्या घराघरात पोहोचली आहे. महाराष्ट्रातही यावरून राज्यभर आंदोलनं झाली. सध्या हिजाबचा मुद्दा चांगलाच तापला असून प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर निशाणा साधला आहे(Prakash Ambedkar targets BJP over hijab controversy).

कर्नाटक सरकारच्या आदेशाला आव्हान देत मुस्लिम विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. आम्ही न्यायालयाला विनंती करतो की, ड्रेस कोडबाबत घटनेत किंवा कायद्यात कोणतीही तरतूद नाही यावर त्वरित निर्णय घ्यावा.त्यावर कोर्टातही सुनावणी सुरू आहेत. सरकारचा निर्णय आला तर समाजात शांतता नांदेल, शांतता नांदेल, असे मत प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

याच वादात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी हिजाबच्या समर्थनार्थ कोर्टाला विनंती केली आहे. जाणून बूजून हिजाब वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप यावेळी आंबेडकर यांनी केला आहे. लोकांना हवे ते परिधान करण्याचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने याची अंमलबजावणी करावी. हा निर्णय आला तर समाजात शांतता नांदेल, शांतता नांदेल, असं मला वाटतं, आशा आशयाचं ट्विट आंबेडकरांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे; रूपाली ठोंबरेंचा हिजाब प्रकरणाला पाठींबा !

हिजाबच्या वादावर आदित्य ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

23-year-old Hindu boy murdered for campaigning against Hijab in Karnataka, prohibitory orders clamped

एवढंच नाही तर त्यांनी संविधान आणि कायद्याचाही दाखला दिला आहे. या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक पोशाखावर कर्नाटक उच्च न्यायालयाकडून बंदी घातली आहे. तसंच सर्व शिक्षण संस्था सुरु करा असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी