31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयहुकूमाची पाने मोदींच्या हातात या राऊतांच्या वक्तव्यावर प्रविण दरेकरांचा टोला

हुकूमाची पाने मोदींच्या हातात या राऊतांच्या वक्तव्यावर प्रविण दरेकरांचा टोला

टीम लय भारी

मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्य सरकारला येत्या ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. परंतु मोदींनी निर्णय घ्यावा, त्यांच्या हातात हुकमाची पाने आहेत, असे संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे (Opposition leader Pravin Darekar has hit out at Sanjay Raut).  

प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र सरकारला पेचात पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) यांना फटकारले. भाजपला मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची जाणीव आहे. हुकूमाची पाने त्यांच्या हातातच असतील तर मग तुमची गरजच काय, असा सवाल भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी उपस्थित केला. परंतु, महाविकासआघाडी कायम आपल्याला जमत नाही ती गोष्ट केंद्रावर ढकलण्याचे काम करते. संजय राऊत (Sanjay Raut) यांना तर रोज उठून मोदी आणि भाजपवर बोलल्याशिवाय चैन पडत नाही, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली.

नादुरुस्त व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा विरोधकांना खोचक टोला

आरक्षाणाचा निर्णय मोदींनी घ्यावा, त्यांच्या हातात हुकूमाची पाने आहेत ; संजय राऊत

Coronavirus: Kerala allows early second Covishield dose for those travelling abroad

राज्यपालांना पत्र देऊन आरक्षण मिळवणे इतके सोपे आहे का?

महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणासाठी राज्यपालांना पत्र दिले होते. परंतु, त्या माध्यमातून आरक्षण मिळवणे इतके सोपे आहे का?, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. त्यासाठी प्रस्ताव सादर करावा लागेल. मग राष्ट्रपतींच्या माध्यमातून तो आयोगाकडे पाठवावा लागेल. यासाठी बराच वेळ जाईल. परंतु, ठाकरे सरकार सर्व गोष्टी केंद्रावर ढकलून दिशाभूल करत आहे, अशी टीका प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्याच हाती संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या हातात टोलवला आहे. मराठा आरक्षणाची हुकूमी पाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पाने टाकावीत, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत राऊत यांना विचारण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे उत्तर दिले. महाराष्ट्रातील प्रत्येक नेता संभाजी छत्रपती यांच्या मताशी सहमत आहे. त्यामुळे सर्व उठून मोदींकडे जाऊया. त्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींना भेटले पाहिजे. कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पाने आहेत. त्यांनीच ती टाकावी, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी