31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयआरक्षाणाचा निर्णय मोदींनी घ्यावा, त्यांच्या हातात हुकूमाची पाने आहेत ; संजय राऊत

आरक्षाणाचा निर्णय मोदींनी घ्यावा, त्यांच्या हातात हुकूमाची पाने आहेत ; संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्य सरकारला येत्या ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर आक्रमक धोरण अवलंबण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. आरक्षाणाचा निर्णय मोदींनी घ्यावा, त्यांच्या हातात हुकूमाची पाने आहेत असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे (Modi should decide the reservation, he has the leaves of the decree in his hand; Sanjay Raut).

राज्य सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भूमिका मांडली आहे. “छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना भेटत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी (Prime Minister Narendra Modi) असायला हवी. मोदींनी (Modi) निर्णय घ्यावा, त्यांच्या हातात हुकमाची पाने आहेत”, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. दरम्यान, वारंवार भेटीची वेळ मागूनही पंतप्रधानांनी वेळ दिली नसल्याचे संभाजीराजे यांनी याआधीच स्पष्ट केले आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली

मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा भाजपला खोचक टोला

At GST council meet, no consensus on more tax relief on vaccines, other medical supplies

संभाजीराजेंचा संताप सरकारने समजून घ्यावा

“छत्रपती संभाजी राजे हे महाराष्ट्रातले सन्माननीय नेते आहेत. शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांचा संताप, त्यांची भूमिका सरकारने समजून घेण्याची गरज आहे. सरकार ती समजून घेत आहे. माझ्या माहितीप्रमाणे राज्यातल्या प्रमुख नेत्यांना ते भेटत आहेत. शरद पवार, मुख्यमंत्री, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांना ते भेटले आहेत. पण सगळ्यात प्रमुख भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याशी असायला हवी. कारण हा प्रश्न आता राज्याच्या हातात राहिलेला नाही. तो केंद्राच्या अखत्यारीत गेला आहे”, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

आपण सगळे जाऊयात पंतप्रधानांकडे

“महाराष्ट्रातला प्रत्येक राजकीय पक्ष, राजकीय नेता संभाजी राजांच्या भूमिकेशी सहमत आहे. आपण सगळे जाऊयात पंतप्रधानांकडे. यामध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असा विषय नाही. नरेंद्र मोदींनी निर्णय घ्यावा, त्यांच्या हातात हुकमाची पाने आहेत. त्यांनी ती टाकावीत. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले हे सगळे एकमुखाने संभाजीराजे भोसले यांच्यासोबत आहेत”, असे देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नमूद केले.

कायदा सगळ्यांना समान असावा!

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी लक्षद्वीपमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर भूमिका मांडताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “आपण जो काही निर्णय घेणार आहोत, तो विचारपूर्वक आणि स्थानिकांना विचारात घेऊनच घेतला पाहिजे. तिथे अस्वस्थता निर्माण झाली, तर त्याचा परिणाम आख्ख्या देशाला भोगावा लागतो. या बेटांवर जर कुणी धार्मिक उन्मादाचा प्रयत्न करत असेल, तर ते चुकीचे आहे. जर कुणी विकास करु इच्छित असेल, तर त्याला विरोध करण्याची गरज नाही. पण कायदा सगळ्यांना समान असायला हवा. लक्षद्वीपमध्ये बीफबंदीचा कायदा तुम्ही आणला. पण इतर भाजपाशासित राज्यांमध्ये तशी बंदी नाही. मग फक्त लक्षद्वीपमध्येच असा कायदा लागू झाला, तर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होणारच. त्यामुळे राजकीय नेते किंवा प्रशासकीय अधिकारी, या सगळ्यांनीच विचारपूर्वक पावले उचलली नाहीत, तर येणाऱ्या दिवसांमध्ये मोठ्या असंतोषाचा सामना करावा लागू शकतो”, असा इशारा संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी