33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयभर पावसात राहुल गांधी गरजले; म्हणाले भाजपला केवळ 40 जागा मिळणार

भर पावसात राहुल गांधी गरजले; म्हणाले भाजपला केवळ 40 जागा मिळणार

कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून, भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत होत आहे. काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी देखील प्रचारात झोकुन दिले आहे. आज कलबुर्गी येथे काँग्रेस उमेद्वाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आले, मात्र त्याचवेळी जोरदार पावसाने सुरुवात केली, तरी देखील भर पावसात राहुल गांधी यांनी प्रचारासाठी उभारलेल्या मंडपातून भाषण केले. यावेळी राहुल गांधी चिंब भिजले होते.

यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले कर्नाटकात आमचे सरकार येणार आहे, त्याला कोणीही रोखू शकत नाही. भाजपला कर्नाटकची जनता 40 जागाच देईल, काँग्रेस पक्षाला कमीत कमी 150 जागा मिळतील असा दावा देखील यावेळी केला. भाजपर टीका करताना गांधी म्हणाले, भाजपने चोरी केली, 40 टक्के कमिशन घेतले. 50 हजार नोकऱ्यांची पदे रिक्त आहेत, ती 50 हजार पदे आम्ही भरु असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

भाषणात राहुल गांधी म्हणाले, कर्नाटकमध्ये आम्ही शिक्षणासाठी विशेष धोरण आणू, जेणेकरुन येथे आयआयटी आणि आयआयएम होऊ शकेल. जेव्हा ”371 -जे” ची चर्चा सुरु होती. त्यावेळी अटलजी आणि आडवाणीजींनी हे होऊ शकत नाही असे म्हटले होते. पण आमचे सरकार आल्यानंतर आम्ही ते करुन दाखवले. भाजप सरकार ”371- जे” आणू शकत नाही असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.

राहुल गांधी यांनी 50 हजार रिक्त पदे भरण्याचे आश्वासन देतानाच, विशेष शैक्षणिक धोरण, प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ कोटी रुपये, महिलांना सरकारी बस मधून मोफत प्रवास अशा घोषणा यावेळी केल्या.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी