31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर सरकारला जाग आली ; खारघर घटनेच्या चौकशीसाठी नेमली एकसदस्यीय समिती !

अखेर सरकारला जाग आली ; खारघर घटनेच्या चौकशीसाठी नेमली एकसदस्यीय समिती !

खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात १३ श्री सदस्यांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची एक सदस्यीय समिती नेमली आहे.

खारघरमधील श्री सदस्यांचे मृत्यू त्यादिवशीच्या अचानक वाढलेल्या तापमानामुळे झाले, असा दावा काही मंत्र्यांनी केला होता. २५ लाखांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी १३ कोटी रुपये खर्चाचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, तरीही कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनामुळे १३ श्री सदस्यांना नाहक जीव गमवावा लागला होता.

हे सुद्धा वाचा

निवृत्त पोलीस हवालदाराचे मारेकरी गजाआड

प्रेयसीसोबत राहण्यासाठी क्रूर बापाने केली 2 वर्षीय चिमुकल्याची हत्या

दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण ; सॅम राजपूत याचा शोध सुरू  

त्यामुळे या संपूर्ण घटनेसाठी प्रशासनाला दोषी ठरवून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती. या सर्व गोष्टींची दखल घेऊन राज्यसरकारने संपूर्ण घटनेची वस्तूस्थिती तपासण्यासाठी महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची एक सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला.

ही समिती संपूर्ण घटनेची वस्तूस्थिती तपासून एक महिन्याच्या मुदतीत आपला अहवाल सादर करणार आहे. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समितीकडून राज्यसरकारला शिफारशी करण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी