31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयराज ठाकरेंची अजब मागणी, विरोधी पक्षात राहण्यासाठी मतं द्या

राज ठाकरेंची अजब मागणी, विरोधी पक्षात राहण्यासाठी मतं द्या

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्याच्या राजकीय परिस्थितीची मला जाणीव आहे. उगीचच ‘उंटाच्या ढुंगणाचा मुका घ्यायचा कशाला प्रयत्न करायचा ?’. म्हणून मी एक ऐतिहासिक मागणी करीत आहे. राज्यात प्रबळ विरोधी पक्ष स्थापन व्हावा यासाठी तुम्ही मला मतदान द्या, असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. मनसेचे सांताक्रुझचे उमेदवार अखिल चित्रे यांच्या प्रचारामध्ये त्यांनी ही मागणी केली.

ते पुढे म्हणाले की, मी ऐतिहासिक भूमिका मांडत आहे. माझे मागणे वेगळे आहे. या राज्याला सर्वार्थाने गरज आहे ती सक्षम, कुणाही समोर घरंगळत न जाणाऱ्या प्रबळ विरोधी पक्षाची. सत्तेतला आमदार सरकारला जाब विचारू शकत नाही. तरूणांना का नोकऱ्या मिळाल्या नाहीत. विकास का झाला नाही. हा जाब विरोधी पक्षातील नेता, आमदारच सत्ताधाऱ्यांना विचारू शकतो. तोच सरकारला नामोहरम करू शकतो. सरकारसमोर प्रबळ विरोधी पक्षासाठी मी समोर आलोय, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.

मला विरोधी पक्ष व्हायचंय अशी मागणी या देशात कुणी केली असेल असे मला वाटत नाही. आजची गरज सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची आहे. त्यांच्या अंगावर जाणाऱ्यांची आहे.

-राज ठाकरे

पीएमसी बँकेच्या मुद्द्यावरूनही राज यांनी भाजपवर हल्ला चढवला. स्वतःचेच पैसे परत मिळावेत म्हणून लोक बँकेच्या बाहेर रांगा लावून उभे आहेत. महिला रडताहेत. बँक बुडाली म्हणून सांगता. पण बँकेवरती, अधिकारपदावरती भाजपचीच माणसं आहेत, अशीही टीका त्यांनी केली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी