30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयअनंत गीतेंनंतर एक एक जण प्रेस घेईन... : रावसाहेब दानवे

अनंत गीतेंनंतर एक एक जण प्रेस घेईन… : रावसाहेब दानवे

टीम लय भारी

मुंबई : शिवसेना नेते अनंत गीतेंनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यावर रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे. अनंत गीतेंनंतर एक एक जण पत्रकार परिषद घेईन आणि अशाच प्रकारची विधाने करतील असे विधान दानवेंनी केले आहे (Raosaheb Danve attack on Anant Gite and MVA government).

आमचा नेता फक्त बाळासाहेब ठाकरेच आहेत. इतर कोणीही आमचा नेता बनू शकत नाही, भले त्या व्यक्तीने काहीही उपाधी लावू दे. असे म्हणत शरद पवारांना अनंत गीतेंनी अप्रत्यक्षपणे टोला लावला आहे. राष्ट्रवादीचा जन्मचं काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकचं राहणार असे ही गीतें म्हणाले.

Raosaheb Danve : ‘रावसाहेब दानवेंची जीभ कापणा-याला देणार गाडी आणि 10 लाखांचे रोख बक्षीस’

मुख्यमंत्री महोदय तुम्ही माझ्या पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो : रावसाहेब दानवे

Raosaheb Danve attack on Anant Gite and MVA government
दानवेंचा मविआ सरकारवर हल्लाबोल

त्यांच्या या विधानावर दानवेंनी मविआ सरकारवर सुद्धा हल्लाबोल केला आहे. सत्तेसाठी या तिन्ही पक्षांनी तडजोड केली आहे. अमर अकबर अँन्थोनी यांची तोंडे तीन दिशेला आहेत. तसेच हे एकमेकांवर आरोप करतील आणि सत्तेसाठी एकत्र सुद्धा राहतील असे रावसाहेब दानवे म्हणाले.

रजनी पाटील यांची काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार म्हणून निवड

‘Future Colleague…’ Uddhav Thackeray’s Veiled Remark on BJP’s Raosaheb Danve Sparks Buzz

त्याचबरोबर मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारची कोणतीही अडचण नाही, असे म्हणत आम्ही १५ ऑगस्टपासून परवानगी दिली आहे. असे दानवेंनी या वेळी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी