31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयपडळकरांविरोधात रोहित पवारांची थेट मोदी-नड्डांकडे ट्विटद्वारे तक्रार

पडळकरांविरोधात रोहित पवारांची थेट मोदी-नड्डांकडे ट्विटद्वारे तक्रार

टीम लय भारी

मुंबई :- सोलापूरातील पत्रकार परिषदेत आमदार गोपीचंद पडळकरांनी ‘रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात’ अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जाहीर टीका केली होती. पडळकरांच्या टीकेनंतर राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवून जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी पडळकरांविरोधात थेट पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे तक्रार केली आहे (Rohit Pawar direct complaint against Padalkar to Modi-Nadda).

“विरोधकांनाही मान देण्याची एक स्वतंत्र राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे आणि आजवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ती संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण राज्यात भाजपचे एक ‘महान नेते’ पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करताना खालच्या पातळीवर पोहोचले आहेत. आपण लक्ष घाला”, अशी विनंती करणारे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. ट्विटरवरुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत मोदी-नड्डांना टॅग करुन पडळकरांविरोधात तक्रार केली आहे (Expressing his feelings on Twitter, he has tagged Modi-Nadda and lodged a complaint against Padalkar).

राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड, पडळकरांचे कार्यकर्ते आक्रमक

‘हे खपवून घेणार नाही’, निलेश लंकेंचा थेट पडळकरांना इशारा

“विरोधकांनाही मान देण्याची एक स्वतंत्र राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे आणि आजवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ती संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण राज्यात भाजपचे एक ‘महान नेते’ पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करताना खालच्या पातळीवर पोहोचले आहेत…”

“आपल्याकडे स्त्रीला देवी मानून म्हणून तिची उपासना करण्याची संस्कृती आहे पण त्या ‘थोर’ नेत्याने आपल्या वक्तव्यात महिलांचा अनादरही केला आहे आश्चर्य म्हणजे राज्यातील अन्य कोणत्याही भाजपा नेत्याने त्यांना फटकारले नाही, किंवा त्यावर भाष्यही केले नाही….”

दगडफेकीनंतर पडळकर आक्रमक, आरोपीसोबत रोहित पवारांचा फोटो शेर…

Maharashtra BJP Leader Says His Car Was Attacked With Stone In Solapur

“राज्याच्या संस्कृती हे शोभा देणारे नाहीच पण माझ्यासारख्या नवीन पिढीला अशी भीती वाटते की अशा ‘महान’ नेत्याने केलेल्या वाईट विधानांमुळे राज्यातील राजकीय संस्कृती खराब होईल. आम्ही हे होऊ देणार नाही, परंतु आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनीही योग्य पावले उचलली पाहिजेत, ही आमची अपेक्षा आणि विनंती आहे….”

Rohit Pawar direct complaint against Padalkar to Modi-Nadda
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रोहित पवार

पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा… रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळे पुढे कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे, अशी जहरी टीका करत गोपीचंद पडळकरांनी पवारांची खिल्ली उडवली. कोंबड्याला वाटते मी आरवल्याशिवाय दिवस उजाडत नाही, असे कोंबडे दिल्लीत एकत्रित आले होते, असा घणाघात पडळकरांनी पवारांच्या दिल्ली बैठकीवरुन केला (Padalkar did this from Pawar’s Delhi meeting).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी