35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयखरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे; रूपाली ठोंबरेंचा हिजाब प्रकरणाला...

खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे; रूपाली ठोंबरेंचा हिजाब प्रकरणाला पाठींबा !

टीम लय भारी

पुणे:- प्रत्येक व्यक्तीला आपल्या जाती-धर्माविषयी आदर असतो. हिंदू असो मुस्लिम प्रत्येक जातीला त्यांच्या त्यांच्या धर्माबद्दल आदर आहे. कर्नाटकात घडलेल्या हिजाब आणि भगवा विरुद्धच्या वादामुळे संपूर्ण देशात वातावरण चांगलंच पेटल आहे. ह्या वादामुळे राजकीय क्षेत्रात तऱ्ह्या ताऱ्ह्या गोष्टींना उधाण आलेलं आहे.(Rupali Thombre’s support for hijab issue)

काही राजकीय नेते या प्रकरणाला समर्थन करत आहेत, तर त्या पलिकडे काही राजकीय पक्ष नेत्यांनी यावर आक्षेप उभा केला आहे, तर काही नेत्यांनी बरोबर काय काय चुकीचे यावर आपले मत मांडले आहे.

काल गुरवारी हेमा मालिनी ज्या अभिनेत्री आणि भाजप खासदार आहेत त्यांनी यावर या प्रकरणाला आपला विरोध दर्शवत आपले मत मांडले आहेत,त्या म्हणाल्या, शाळा – महाविद्यालय ही शिक्षणासाठी आहेत. आणि येथे गणवेश हा एक प्रकारचा नियम आहे. त्यामुळे शाळेत कोणीही धर्म जात घेऊन येऊ नयेत. शाळा – महाविद्यालयाच्या बाहेर तुम्हाला जे करायचं ते करा. अशी त्यांनी आपली प्रतिक्रिया मांडली.

हे सुद्धा वाचा

रुपाली ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हिजाबवरुन आंदोलन न करण्याचे गृहमंत्र्याचे आवाहन

हिजाबच्या वादावर आदित्य ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

Karnataka Hijab Row Live Updates: HC restrains students from wearing hijab, saffron shawls; tells govt to reopen schools

त्यातच आता रुपाली पाटील ठोंबरे ज्या कधीकाळी मनसेच्या शिलेदार होत्या, आता मात्र त्या कोणत्या पक्षात जाणार याची अद्याप कोणालाही कल्पना नाहीय, मात्र त्यांनी देखील हिजाब विरुद्ध भगवा या प्रकरणावर आपले मत मांडून हिजाब या विषयाला समर्थन दिले आहे. त्यांनी आपल्या फेसबुक वर पोस्ट शेअर करत त्यात, प्रत्येकाला आपल्या जाती धर्माचा अभिमान असावा पण कोणाचाही तिरस्कार नसावा…! कोणत्याही अगदी कोणत्याही धर्माची स्त्री ही आपली जबाबदारी आहे, आणि आपण भारतीय असल्यामुळे हे आपले कर्तव्य आहे. सर्वधम समभाव या मंत्र बाळगला पाहिजे. अस लिहितं #जय जिजाऊ असे लिहिले आहे. एकंदरीत रुपाली पाटील ठोंबरे चे या हिजाब विरुद्ध भगवा या पैकी हिजाब या विषयाला समर्थन आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी