30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्री राम शिंदे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराचा अर्ज वैध 

मंत्री राम शिंदे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराचा अर्ज वैध 

लय भारी न्यूज नेटवर्क 

जामखेड: एकीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याची अफवा सोशल मिडीयात चर्चेत आल्यानंतर मतदारसंघातील राजकीय वातावरण चाांगलेच ढवळून निघाले होतेे.तर दुसरीकडे  पणन व वस्त्रोद्योग या खात्याचे मंत्री राहिलेले कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महायुतीचे उमेदवार प्रा राम शिंदे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या राम रंगनाथ शिंदे या अपक्ष उमेदवाराचा अर्ज वैध ठरल्याने मंंत्री राम शिंदे समर्थकांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली होती.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यातील मंत्री राम शिंदे व अपक्ष उमेदवार राम शिंदे या दोन्ही उमेदवारांची नावे व आडनावे सारखीच आहेत. मात्र दोघांच्याही वडिलांची नावे वेगवेगळी आहेत. मंत्री राम शिंदे यांच्या नावाशी साधर्म्य असलेला उमेदवाराचा अर्ज वैध ठरला आहे. आता हा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात कायम राहतो की निवडणूकीतून माघार घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जर हा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात कायम राहिल्यानंतरच मतविभागणीच्या डावाचे खरे स्वरूप स्पष्ट होईल.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले अफवा बहाद्दरांना ट्रोल 
राज्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात मंत्री राम शिंदे विरूध्द शरद पवारांचे नातू रोहित पवार असा थेट सामना होणार आहे. विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी रोहित राजेंद्र पवार या डमी उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवारांचाच अर्ज बाद झाल्याची अफवा दिवसभर सोशल मिडीयावर पसरल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दिवसभर नेत्यांना फोन करून याबाबत विचारणा केली जात होती. दरम्यान डमी उमेदवार असलेल्या रोहित पवार या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याची खात्रीशीर माहिती पुढे आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अनेकांना ट्रोल केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी