34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांचा शिवसेना भवनावर बोलणाऱ्यांना इशारा; स्वत:च्या पायावर याल, पण जाताना...

संजय राऊतांचा शिवसेना भवनावर बोलणाऱ्यांना इशारा; स्वत:च्या पायावर याल, पण जाताना…

टीम लय भारी

मुंबई:- शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आमदारांना सज्जड दम दिला आहे. भाजपच्या काही आमदारांनी शिवसेना भवनावर वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. यावरून संजत राऊत प्रचंड संतापले आहेत. शिवेसना भवन फोडण्याची भाषा करणारे भूमिगत झाल्याचे कळले आहे. हिंमत असेल तर समोर या. स्वत:च्या पायावर याल, पण खांद्यावर जाल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे (Sanjay Raut warning to those speaking at Shiv Sena Bhavan).

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना प्रचंड संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपच्या आमदारांना चांगलंच फैलावर घेतलं. महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते कार्यकर्ते असो, ज्यांना महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेविषयी जाणीव आहे ते असे कोणतेच विधान करणार नाहीत. मूळ भाजचे लोक असे विधान कधीच करणार नाही. देवेंद्र फडणीस असतील आशिष शेलार असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही असतील. कोणीही असं विधान करणार नाही. जे बाहेरून आलेले लोक आहेत. जे बाटगे आहेत. ते आपली निष्ठा दाखवण्यासाठी असं विधान करून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात (Sanjay Raut, while interacting with the media, expressed his indignation).

बाटग्यांवरुन सामन्यातील राऊतांच्या अग्रलेखाला प्रत्युत्तर देत नितेश राणे म्हणाले…

सात्विक गणपतराव देशमुख आणि साजूक तुपातील बिर्याणी…

भाजपमधून या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली असेल, असे सांगतानाच जे महत्त्व हुतात्मा स्मारकाला आहे. साधारण तिच भावना लोक शिवसेना भवना विषयी व्यक्त करत असतात. कुणाला एवढी खूमखूमी आली असेल, कुणाला झटका आला असेल तर हिंमत असेल तर समोर या. आता ते भूमिगत झाल्याचे कळते. पण स्वत:च्या पायावर याल आणि खांद्यावर जावं लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

Sanjay Raut warning those speaking Shiv Sena Bhavan
संजय राऊत

काँग्रेस-रिपाइंनेही अशी भाषा केली नाही

आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी ही भाषा केली, ज्यांनी ज्यांनी हा घाणेरडा विचार केला. त्याचे पुढे काय झाले याच्या नोंदी इतिहासात आहेत. ते त्यांनी पाहावे. ही काही भाजपची भूमिका असून शकत नाही. भाजपच काय काँग्रेस आणि रिपाइंची कुणाचीच अशी भूमिका असू शकत नाही. आमचे मतभेद असतात. ते आम्ही भाषणातून व्यक्त करू. पण शिवसेना भवनाविषयी कोणी बोलणार नाही. शिवसेना भवन हे प्रखर राष्ट्रवादाचे प्रतिक आहे. ते तोडण्याफोडण्याची भाषा नतद्रष्टच करू शकतात. बाटगेच करू शकतात एवढेच मी सांगेल, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे (Sanjay Raut said that even the Congress-RPI did not use such language).

महाराष्ट्र हळहळला, 16 कोटीच्या इंजेक्शननंतरही चिमुकल्या वेदिकाचा आज पहाटे मृत्यू

Sanjay Raut: Won’t accept BJP leader’s apology on Shiv Sena Bhavan remark

भाजपला किंमत मोजावी लागेल

सत्ता गेल्याने त्यांना झटके येतात. बाटग्यांना झटके येतात. सत्ता भोगायला मिळेल म्हणून त्या पक्षात गेले. पण सत्ता न आल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून काही लोके असे उद्योग करत आहेत. भाजपसारख्या एका जुन्या पक्षाला त्याची फार मोठी किंमत या लोकांमुळे मोजावी लागेल. ज्यांनी ज्यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याची भाषा केली. त्या पैकी कोणीही राजकारणात शिल्लक राहिलं नाही. सार्वजनिक जीवनात राहिलं नाही, हे लक्षात ठेवा, असंही त्यांनी सांगितले.

टीकेला शिवसेनेने कधीही पाठ दाखवली नाही

शाब्दिक चकमकी होत असतात. टीकेला शिवसेनेने कधीही पाठ दाखवली नाही. आम्ही टीका सहन करणारे लोक आहोत. भाषेविषयी मतभेद असू शकतात. पण टीकेचे प्रहार होत असतात. पण ज्या प्रकारची भाषा शिवसेनेबाबत केली गेली. ती महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला पटलेली नाही, असं सांगतानाच अशा लोकांमुळे कायदा सुव्यवस्था का बिघडेल? अजिबात बिघडणार नाही. आम्हाला काय करायचे माहीत आहे. त्याबाबत शिवसेना एक्सपर्ट आहे. या आसपास फिरून दाखवा. दिलगिरी व्यक्त केली ठिक आहे. पण या चुकीला माफी नाही. महाराष्ट्र हे लक्षात ठेवेल आणि शिवसेनाही हे लक्षात ठेवतो, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे (Sanjay Raut said that Shiv Sena has never backed down from criticism).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी