28 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeराजकीयनीतेश राणेंकडून माझ्या जिवाला धोका; शिवसेना उमेदवार सतिश सावंतांचा आरोप

नीतेश राणेंकडून माझ्या जिवाला धोका; शिवसेना उमेदवार सतिश सावंतांचा आरोप

लय भारी न्यूज नेटवर्क

कणकवली : नीतेश राणे यांनी कोकणामध्ये वेगेवेगळ्या भागातून गुंड आणून ठेवले आहेत. माझ्या जिवाला त्यांच्यापासून धोका आहे, अशी तक्रार  शिवसेनेचे कणकवलीचे उमेदवार सतिश सावंत यांनी पोलिसांकडे केली आहे.

नीतेश यांनी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर व इतर भागातील गुंड कोकणात विविध भागात आणून ठेवले आहेत. त्यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्यावर हल्ला होऊ शकतो. मला पोलीस संरक्षण हवे आहे, असे सावंतांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
कणकवली मतदारसंघात भाजपचे नीतेश राणे विरुद्ध शिवसेनेचे सतिश सावंत अशी लढत होत आहे. शिवसेना व भाजपा युती असूनही शिवसेनेने येथे भाजपा विरोधात बंड पुकारून राणेच्या पराभवासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. यामुळे येथील सामना चांगलाच रंगला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर सभेतच नीतेश यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. लोक उचकवण्याचा प्रयत्न करतील. पण आपण शांत व संयमीपणाने काम करायला हवे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी