28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रव्यापार-उद्योग विकासाला प्राधान्य - उद्योगमंत्री उदय सामंत

व्यापार-उद्योग विकासाला प्राधान्य – उद्योगमंत्री उदय सामंत

देशाच्या आणि राज्याच्या अर्थ व्यवस्थेमधील महत्वाचे घटक म्हणून व्यापारी आणि उद्योजक यांची विकासाला प्राधान्य विशेष महत्वाचे असल्याने महाराष्ट्र सरकार  व्यापार उद्योग क्षेत्रामागे भक्कमपणे उभे आहे.असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले . केवळ परदेशातील किंवा मोठे उद्योजकच नव्हे तर लहान उद्योजकांनाही रेड कार्पेट असा दृष्टिकोन शासनाचा असल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर पोहचला आहे. नाशिक हे केवळ राज्यातच नव्हे तर संपुर्ण देशात आणि जगाच्या नकाशावर अनेक क्षेत्रात झळकत आहे. येथील उद्योगांच्या, व्यापारी व्यवसायीकांच्या आणि कृषी क्षेत्रातील उद्योगांच्या अडचणींची जाणीव सरकारला आहे. महाराष्ट्र चेंबरसारख्या संस्थांनी याबाबतीत वेळोवेळी सरकारचे लक्षही वेधले आहे.

देशाच्या आणि राज्याच्या अर्थ व्यवस्थेमधील महत्वाचे घटक म्हणून व्यापारी आणि उद्योजक (Trade and industry) यांची विकासाला प्राधान्य विशेष महत्वाचे असल्याने महाराष्ट्र सरकार  व्यापार उद्योग (Trade and industry) क्षेत्रामागे भक्कमपणे उभे आहे.असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी केले . केवळ परदेशातील किंवा मोठे उद्योजकच नव्हे तर लहान उद्योजकांनाही रेड कार्पेट असा दृष्टिकोन शासनाचा असल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर पोहचला आहे. नाशिक हे केवळ राज्यातच नव्हे तर संपुर्ण देशात आणि जगाच्या नकाशावर अनेक क्षेत्रात झळकत आहे. येथील उद्योगांच्या, व्यापारी  व्यवसायीकांच्या आणि कृषी क्षेत्रातील उद्योगांच्या  अडचणींची जाणीव सरकारला आहे. महाराष्ट्र चेंबरसारख्या संस्थांनी याबाबतीत वेळोवेळी सरकारचे लक्षही वेधले आहे.(Trade and industry development a priority: Industries Minister Uday Samant)

अशा सर्व बाबींकडे सकारत्मक दृष्टीने सरकार काम करत आहे असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी महाराष्ट्र चेंबर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रीकल्चर तर्फे आयोजित निमा, आयमा, जितो, लघुउद्योग भारती नाईस, नाईस सीमा, नाशिक धान्य घाऊक किराणा व्यापारी संघटना नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटना, नाशिक रिटेल क्लॉथ मर्चंट असोसिएशन, क्रेडाई, नाशिक  रेडीमेड अँड होजिअरी क्लॉथ मर्चंट  असोसिएशन व  उद्योजक, व्यापारी संघटनांच्या सहकार्याने आयोजित विशेष संवाद सभेमध्ये केले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी हे होते.

उद्योग वाढले  सध्याच्या सरकारच्या काळात नाशिकमध्ये १४९४ तर महाराष्ट्र एकूण ३५ हजार इतके उद्योग  वाढले याचे एक महत्वाचे कारण तातडीने निर्णय घेणे हे असल्याचे उद्योगमंत्र्यांनी नमूद केले. व्यापारी उद्योजकांच्या मागे उभे राहिल्याने व त्यांच्या समस्या लवकरात लवकर दूर केल्याने अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते व रोजगार निर्मितीही होते याची जाणीव असल्यामुळे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि एकूणच सरकार अक्शन मोड वर काम करत आहे. अशावेळी या क्षेत्रातील संघटनांनी व कार्यकर्त्यांनी मनात कोणताही किंतु न ठेवता आपल्या अडचणी व योजना यावर मोकळेपणाने संवाद साधावा असेही त्यांनी आवाहन केले. शेवटी, सकारात्मकपणे काम करणाऱ्या सरकारच्या मागे सुजाण नागरिकांनी व व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक आदीनी आपली शक्ती उभी करावी, असे प्रतिपादन केले. सुरवातीला महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा यांनी स्वागत करताना चेंबरच्या कार्याची माहिती देऊन नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी उद्योगमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती देऊन त्यांचे आभार मानले. त्यानंतर आपल्या प्रास्ताविकातून चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नाशिक विभागामध्ये जाणवणाऱ्या मुख्य समस्यांचा उहापोह करताना येथील विमानसेवा, पुणे नाशिक रेल्वे, उद्योगासंदर्भातील संरक्षण, इलेक्ट्रिक, भगर क्लस्टर,  कांदा विषयक समस्या, याबाबत उहापोह करून त्या लवकरात लवकर दूर करण्याचे गरज प्रतिपादन केली.

उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) हे सातत्याने उद्योगविषयक प्रश्नात जातीने लक्ष घालून त्या सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात याबद्दल त्यांचे विशेष आभारही व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित संघटनांचे पदाधिकारी व सदस्य व उद्योजकांनी अनेकविध प्रश्न आणि समस्या सादर करून आपल्या सूचनाही केल्या. प्रामुख्याने त्यामध्ये नवीन उद्योगांसाठी जागा मिळणे, महाग वीजदर आणि अपुरा वीज पुरवठा, निर्यात विषयक वाहतूक समस्या, आयटी हब, औद्योगिक वसाहतीतील रस्ते विषयक समस्या, ट्रक ट्रमिनल, मालमत्ता करविषयक समस्या, सहकारी औद्योगिक वसाहतीच्या समस्या, बाजार समिती कायद्याच्या अडचणी, महापालिकेचे परवाना धोरण आदींचा समावेश होता. शिवाय नाशिकच्या पर्यटनाच्या दृष्टीने व खासकरून कुंभमेळ्याच्या पार्शवभूमीवर एक कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यांनी अशीही मागणी झाली होती. या अनुषंगाने एक सविस्तर निवेदनही उद्योगमंत्र्यांना सादर करण्यात आले.

यावेळी आमदार श्रीमती देवयानी फरांदे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यापार उद्योग प्रश्नांबाबत शासन संवेदनशील असल्याचे सांगून विकासाच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व सूचनांचा पाठपुरावा केला जाईल असे सांगितले. सूत्रसंचालन शाखा चेअरमन संजय सोनवणे व दत्ता भालेराव यांनी केले. आभार आभार वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांनी मानले. चेंबरचे सदस्य प्रशांत राका यांचे चिरंजीव उत्सव राका यांनी घवघवीत यश मिळविल्याबद्ल त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार त्यांच्या कुटुंबाने स्वीकारला. याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष नितीन बंग, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, जितोचे अध्यक्ष सुबोध शाह, क्रेडाईचे अध्यक्ष कुणाल पाटील, आयमाचे अध्यक्ष ललित बुब, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तपाडिया, योगेश जोशी,  नाशिक धान्य घाऊक  किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल संचेती, नाशिक धान्य किरकोळ किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ अमृतकर, नाशिक रिटेल  क्लॉथ मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष नरेश पारख, नाशिक होलसेल क्लॉथ मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष बालकिसन धूत, स्टाइसचे अध्यक्ष नामकर्ण आवारे, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे आदींसह नाशिकमधील सर्व व्यापारी औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी व महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारणी समिती सदस्य विजय वेदमुथा, हेमंत कांकरिया, संदीप भंडारी, ललित नहार, आशिष नहार, विकास पगारे, भावेश मानेक, राजेश मालपुरे, मनिष रावल,राजेंद्र कोठावदे, रविंद्र झोपे, कैलास पाटील, रवी जैन, उपस्थित होते. धुळे, सिन्नर, कळवण, घोटी, इगतपुरी, दिंडोरी, नाशिकरोड येथील उद्योजक, व्यापारी, शेतकरी, पर्यटन व्यावसायिक, सल्लागार व महिला उद्योजक  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी